________________
प्रसंग अडतीसावा । ५१३
राजा धार्मिक श्रीमंदर । जैनधर्मी तो धुरंधर । सारमंत्र पंचनमस्कार । कर्णद्वार संन्यासयुक्त ॥८॥ परोपकार सम्यक्त्वी । जेविका कल्पवृक्ष क्षिती। मंत्रप्रसादे स्वर्गप्राप्ती । देव होती स्वधर्मस्वर्गी ॥९॥ श्रीमद्जैनेंद्र वद्धर्मान । सम्यक्त्व जीवा हितकारण । ऐसे जानोन ज्ञाते जन । करावे पालन सुधर्माचे ॥१०॥ पुत्रवृत्तान्त ऐकोनिया । क्रोध उत्पन्न जाला राया। सिद्धार्थ मंत्री पाचारूनिया । सांगे तया त्या त्रीनि हन्त्वा ॥११॥ तं वार्ता श्रवन तिघासी । मंत्री श्रेष्ठी नृपात्मजासी । पलायन केले वनासी । करि मानसि पश्चात्ताप ॥१२॥ आम्ही जैनधर्मी शुद्ध । हृदयी सुचली कुबुद्ध । रसनाविषयी जालो लुब्ध । धिक् जन्मान्ध संसार हा ॥१३॥ ऐसा पश्चात्ताप करिता। मुनी पाहिले अवचिता। दर्शन शुद्ध करी त्वरीता । मन शुद्धता जाली त्याची ॥१४॥ मुनीदत्त गुरूसी पाहोन । दीक्षा घेतली भाव धरोन । घोर दुःसह तप करोन । धर्मध्यान मार्ग मोक्षाचा ॥१५॥ घातिकर्म ते चतुष्टय । मुनीराज केला क्षय । केवळज्ञानाचा उदय । चतुनिकाय देव आले ॥१६॥ पूजाभक्ती करोनिया । स्तवन करिती तया ठाया । ते श्रुत जाले श्रीमंद्रराया । गेले पूजावया स्वामीसी ॥१७॥ महत् पाप करिती प्राणी । जिनधर्म निश्चयता मनी । होति त्रैलोक्य ते पूजनी। धर्म करोनी किं किं नोव्हे ॥१८॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org