________________
प्रसंग अडतीसावा : ५०९
खातिका भयंकर विस्तीर्ण । गंगा ओघ चहुकडोन । जळ चंचळ गरगर नयन । पाहिल्यान न पहावे ॥१३५॥ तत् समयी तो स्वर्गद्र । मनिकेतु तो खगसूर । संबोध करावया त्वर । राजा सगर सिंहासनी ॥१३६॥ मायावेश तो ऐरावत । पाहता पाहता तन्मृत्यू । राजा विस्मय करी मनात । पश्चात्तापार्थ न जानेची ॥१३७॥ तदा देव जाला ब्राम्हण । सभेमाजी करी रूदन । अहो चक्रेश माझा नंदन । नेतो वोढोन काळ त्यासी ।।१३८॥ तुम्ही दयावंत हो राव । मम पुत्रासी सोडवाव । स्वपुत्र ऐसे त्वा भावाव । पुनदान द्याव मजलागी ॥१३९॥ द्विजवचन ऐकोनिया । किंचित् हास्य आले राया । रे रे मूढ बोलसी वाया । काळ कर्म माया कोन वारि ।।१४०।। जीव सिद्धपदवी धरी । तरी काळभय नीवारी । नरदेही दीक्षा स्वीकारी । अष्टकर्मारि स्वात्महित ।।१४१॥ हे ऐकोनि द्विज बोलले । राया हे सत्य सांगितले। आम्हागरी बाहे न चाले । तुम्हीच केले पाहिजे ॥१४२।। सर्व परिवार समस्त । यम नेईल त्वपुत्रात । धन यौवन त्रय संतत । संसार अनृत सर्वही ॥१४३॥ तत् बोध कर्णी जाला श्रवण । पापबाधा मुर्छना येवोन । न धरत पृथ्वी दंडाससन । तदा प्रधान सीतोपचार ॥१४४।। गुरूवाक्य अमृतवाणी । सज्जन मैत्रे समजाउनी । तत् त्रिधा वैराग्य मनी । चितवी मनी अनुप्रेक्षा ॥१४५।। पाचारी भगीरथ पुत्रासी । स्वराज्य दिधले तयासी । आपन गेले गुरूपासी । त्रिपरीत्य नमोस्तु ते ॥१४६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org