________________
प्रसंग दुसरा : २५ एकदा फाल्गुण अष्टान्हिका । मदनावलि परम धार्मिका । तद्भाव उत्पन्न झाला निका । तो आइका भव्य जन ॥११७॥ रथयात्रा करावयासि । भाव उद्भवला मानसि। मेळवुनि चतुःसंघासि । आरंभ रथासि केला असे ॥११८॥ ऐसि वार्ता ऐकोनि । महज्ञान दर्षे करोनि । संघश्री बौध क्षोभला मनि । गेला तत्क्षणि राज-मंदिरि ॥११९॥ तदा तो वंदक दुर्मति । वदता झाला नृपाप्रति । आम्हासि जिंकोनि वादाथि । मग रथाप्रति चालविजे ॥१२०॥ तद्वाक्य करोनि श्रवण । नृप वदे रानिकारन । प्रिये आइकावे मद्वचन । तुज कारण सांगितो ॥१२१॥ बोध दर्शन मेघडंबर । विस्तारिले पृथवीवर । जेन्हे जिनदर्शन दिवाकर । झाकोनि अंधार पाडिला ॥१२२॥ सांप्रत्य आपुले जिन शासनि । कोन्हि ज्ञानवान दिसे मुनि । बौद्ध मतासि उच्चाटुनि । रथालागुनि चालावे ॥१२३॥ जिनदर्शन करोनि समर्थ । मग त्वा चालवावे रथ । जेन्हे पुरती मनोरथ । होईल कीर्त जगामाजि ||१२४॥ ऐकोनि रायाचे वचन । रानीचे दुखविले मन । म्हने धर्मासि आले विघ्न । कैसे निवारण होईल ॥१२५।। उद्विग्न होवोनि निजांतरि । शीघ्र जावोनि जिनमंदिरि । मस्तक ठेवोनि पृथ्वीवरि । वंदना करि जिनपदि ॥१२६॥ तदा देखिला मुनीश्वर । तत्पदि केला नमस्कार । म्हने हो स्वामि ज्ञानभांडार । करि पूर्ण सत्वर मन्मनोरथ ॥१२७॥ स्वज्ञाने जिंकोनि वंदकासि । त्वरे चालवावे रथासि । उद्योत होइल जिनमार्गासि । भव्यजनासि सौख्य होइल ॥१२८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org