________________
४६४ : आराधना कथाकोष लुब्धक प्रसंसा करित । वृषभ घ्या म्हणे रायात । राजा म्हणे दावि ह्याते । पाहु तयात कैसा ग्राहे ॥५३॥ तेव्हा त्या लुब्धकरायासी । घेवोनि गेला स्वगृहासी । आदरमान बहु त्यासी । लोभ मानसी द्रव्याचा ॥५४॥ वृषभ दाविला तयान । सुवर्णाचा तो पीतवर्ण । हिरेजडित दिव्यमान । महायत्न निर्माण केला ॥५५।। साहेब हे अमोल वस्तु । तुम्हा घरी असावी वस्तु । द्रव्य द्यावे आम्हा त्वरितु । लोभ मनात द्रव्याचा ॥५६॥ राजा समजला अंतरी । द्रव्यलोभी हे महादरिद्री । तव तयाचिच स्वस्त्री । ज्ञानचतुर स्त्री षड्गुणी ॥५७॥ रत्न भरोनिया तबक । त्वरे आनी राया सन्मुख । ते पाहुनि या लुब्धक । फण अंगोळिक सवज्ञानं ।।५८॥ तबक दिधले श्रेष्टीपासी । नजर करावी धन्यासी । ह्यदय स्फोट झाला त्यासी । धनलोभासी न देववे ॥५९।। देव धर्म कधी करीना । गुरुशास्त्र काही जानेना । धन लोभ्याच्या पाहे खुणा । भूपती मनी कंटाळले ॥६०॥ दुष्ट मष्ट हा अपवित्र । तयाचे पाहोनी चरीत्र । मुख न पाहावे याचे नेत्र । वेगे वगन गृहागता तो ।।६१।। या नंतर कितीक दिनि । लुब्धदत्त विचारि मनी । द्रव्याचा लोभ धरोनी मनी । वृषभ घेवोनी सुवर्णाचा ।।६२॥ चालला तो सिंहलद्वीपासी । विक्रीत केला वृषभासी। कोटी सुवर्ण धनासी । महाकष्टेसी मेळवीले ॥६३।। व्यापारी भरोनिया तेन । जहाजी बैसला तो जैन । चालले वायोच्या सुतान । मनात म्हणे मेळऊ द्रव्य ।।६४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org