________________
४६० : आराधना-कथाकोब
पेटारी पाहे उघडोन । जंगित काळिमा पाहोन । त्यातील एक घेवोन | जिनदत्त दुकान देखिले ॥८॥ जिनदत्ता हस्तकि दिल्ल । सावजी याचे द्यावे मोल । त्या दुकानात ठेवल । मोल दिल न पाहता || ९ || सेटि म्हणे नोव्हे लोखंड । बहु दिसत भारि जड | वजन करित प्रचंड | हेमदंड समजला त्या || १० || म्हणे नेम आहे आम्हास । भोळ घेता कुचला दोस । लोह म्हणोनि सुवर्णास। परद्रव्यास घेवो नये ॥११॥ मंजुरी होता दुकानि । त्यास दिधले परतोनि । पिण्याकगंधाच्या दुकानी । लोखंड म्हणोनि दिधले ||१२|| लोभ धरोनि हृदयात । टका दिधला एक त्यात । मजूर म्हणे घ्याल नित्य । आनोनि तुम्हा देईन ।। १३ ।। कित्येक दिवस तयान । आठ्यान्नव कांबि सुवर्ण । परद्रव्यलोभ त्या मने । पाप न जाने द्रव्यलुब्धी || १४ || बहिण आली एके दिनि । लग्ना नेला भिड खर्चानि । कांबि घ्या म्हणोनि । लोखंडाचे मोलानी सांगे त्या ।। १५ ।। भाच्याच्या लग्नास गेला | दुकानास मंजुरि आला । विष्णुदत्त पाहे तयाला । परद्रव्याला घेऊ नये ।। १६ ।। तेव्हा राज्याचा कारभारी । माणूस पाहिला स्वनेत्री । अक्षर वाचिता वग्त्री । शत ठगली पेटारीत ॥ १७ ॥ ते रिक्त देखोनि नयनि । रायासी सांगे जावोनी | राय म्हणे त्या लागोनी । मानस घेवोनि या सर्व ॥ १८ ॥ मंजुरि आदि करोन । बोलाविले सर्व जन । त्यासि राजा बोले वचन । द्यावे सांगोन सत्य सत्य ॥ १९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org