________________
प्रसंग पस्तीसावा श्री वीतरागाय नमः
श्लोक :-प्रणम्य त्रिजगन्नाथं । श्री जिनं सारशर्मदं । वक्षे पिण्याकगंधस्य । चरित्रं धनलोभिनः ॥१॥ कपिला नगरी विस्तीर्ण । रत्नाख्य राजा पुण्यवान । राणी विद्युत्प्रभा षट्गुण । ऐश्वर्य संपूर्ण मंडित ॥२॥ तेथे श्रावक जिनदत्त । जिनपदि षट्पदवत । राजादी जिनधर्मीरत । बुधिवंत श्रावकचारी ॥३॥ त्याच ग्रामी असे एक । पिण्याकगंध तो श्रावक । ते हे तीसकोड द्रव्येक । परि लोभ अधिक त्या मनि ॥४॥ न देव न धर्म न खाय । गुरू शास्त्र तीर्था न जाय । न खाए न पीए न दिए । पुढती होए दुःखपाप ॥५॥ तस्य स्त्रिया सुंदर खानि । विष्णुदत्त पुत्र सद्गुणी । धन पुष्कळ असोनि । धर्मालागोनि सांभाळिता ॥६॥ एकदा राजा तडागास्तव । खानिता अज्ञान एक जीव । पेटारी देखजि त्याठाव 1 सुवर्ण अधवकांबिका ॥७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org