________________
प्रसंग चवतीसावा । ४५३ तेथे होता वृषभनंदि । त्यान धरिला मुखामदि । सासनदेवी गुप्तशब्दि । खोटि बुधी जन मत्सर ।।११४।। जन वदति दोघ सत्य । पुष्पवृष्टि देवी करित । पापि पाहोनि प्रस्तावत । सावधचित्ते भो श्रेष्ठि ।११५। कथा ४।। जिनदत्त लोभि मनात । कथा सांगे चित् भ्रमित । गंगातीरासि हस्ती येत । जळ प्रासित समुदाए ॥११६॥ त्यात एक हस्तीवाळ । कर्दमी रुतला निर्बळ । तापस विश्वभूति दयाळ । करि प्रतिपाळ काढोनिया ॥११७।। दिवस दिवस प्रौढ जाला । महागज नामाथिला । श्रेणिकरायाने देखिला । गज घेतला बहुमोले ।। ११८।। बंधन अंकुशादि घात । तंदुळादि खाद्य बहुत । ते न माने ऐरावताते । तोडि समस्त येता परगृही ।।११९।। बावाने हस्त फिरवोन । म्हणे तेथे तुमचे कल्यान । गज न मानि ते वचन । सोंड फिर्वोन मारि त्यासि ॥१२०॥ भिक्षुक पाळिला तो हस्ती । घात केला येवोन मस्ती । तैसे करावे काय वो जति । न जानति उपकारार्थ ।।१२१॥ कथा५॥ मुनि म्हणे ऐक सखया । तिर्यंचाचि बुधि वाया। कथा श्रवण करावि त्वया । पुत्र स्त्रियासमवेत ॥१२२॥ हस्थिनागपुर विख्यात । विश्वषेण राज्य करित । पूर्वदिशेसी बागाईत । अंब्रफळ शोभत पुष्यादि ।।१२३।। तया आंब्रवृक्षावरौत । गृधपक्षि सर्प भक्षित । सर्पविष फळ लिंपित । पक्व बहुत माळि पाहे ॥१२४॥ ते अमृतफळ घेवोनि । रायासी दिधले आनोनी। धर्मसेना रायाचि रानि । प्रीति करोनि तीस दिल्हे ।।१२५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org