________________
प्रसंग चवतीसावा. ४५१
तो राखी मार्जारकुकर । पलंगी निजला कुवर । कांडन घातले बाहेर । स्वर मधुर साळीकांडी ॥९०॥ अहो श्रेष्टी कर्ममहन । जैसे छेडि तैसे भोगन। त्या बाळासी सर्प येवोन । डंकिता मुंगसान मारिला ॥९१॥ भुजंगाचे तुकडे केले । मुख रक्ते लिंपित झाले । मुंगस मातेपासी आले । ते पाहिले कपिलेनेत्री ॥९२॥ हाहाःकार तिने केला । म्हणे पुत्र याने मारीला । लहानाचा म्या गे थोर केला । बाळ खाल्ला एकुलता एक ॥९३॥ बाळ अपला न पाहोन । क्रोधे भ्रमले तिचे मन । मुंगसा मुसळ घात करोन । दुःखी होवोन रण्यवासी ॥९४॥ अविवेकी गेली गृहासी । खेळिता देखिले बाळासी। भुजंगे पाहिला नेत्रेसी । पश्चात्तापासि करती दोघ ॥१५॥ श्लोक:-भो श्रेष्टिन् सर्पदोशोऽया किं तस्या विप्रयोषिताः। युक्तं निरापराधस्य न कुळस्यैव मारणं ॥९६॥ कथा ॥२॥ ते ऐकोन श्रेष्टी म्हने । कथा ऐका मम रसने । वाराणसी ग्रामि पुण्य । विचक्षण जितशत्रुशे ॥९७॥ तेथे वैद्य धनदत्त । धनदत्ता नारी शोभत । धनचंद्र धनमीत्रस्त । पुत्रे शोभत दोघे जन ॥९८॥ राजवैद्य शास्त्रपठन । पिता पावला तो निधन । राय तयासि बोलाउन । सभामान्य अभय दिल्हे ॥१९॥ एकदा चंपापुरधीशे । रोगव्याप्त बोलावि त्यासे । जाता वनमार्ग तयास । व्याघ्र दृष्टीस पाहिला ॥१०॥ माथा शूळ अंधनयन । महाव्याधी दु:खी मन । ते पाहोन लघुभ्रातान । भैषज नयनसू दिले ॥१०१॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org