________________
प्रसंग चवतीसावा : ४४५
मुनि मेरूसमान धीर । कायागुप्ती धरी स्थिर । तव बम्हांडाचे तुटली सीर । चरणकर उभारले ||१९|| चूल खचली हांडी पडली । पापी जोगी विद्या चळली | म्हणे भूतप्रेत उठली । प्रेत पाहिली भयंकर ॥२०॥ जोगी तेथोनिया पळाला । मूनि पाहे त्रिगुप्तीला । मेरूसमान धीर धरला । दिनकर झाला उद्योत ॥२१॥ एक्यापुरुषे पाहिला मनि। जिनदत्तासी सांगे कर्णी । तुमचे गुरू त्या स्मशानि । मस्तक वन्ही दग्ध झाले ||२२|| ते ऐकोनिया श्रावक । सर्वं गेले स्मज्ञान भूमिक | हाहाःकार केला सकळीक | आनिला पालक तत्समई ||२३|| बहुत शिष्टाई करोन । स्वगृहासि आले घेवोन । वैद्यासी त्वरे बोलाऊन । करावा प्रयत्न औषधाचा ||२४॥ वैद्य म्हणे जिनदत्तासी । सोमश्रमा ब्राम्हणापासी । लक्षपाकतेल व्यापासि । औषधासि आनावे त्वरे ॥२५॥ श्रेष्टिन ते ऐकोन कर्ण । त्वरे गेला द्विजसदन । तद्भार्या तुकारि सगुण । तेल देन लक्षमूळिचे ॥२६॥ तुकारि म्हणे औषध घेई । औषधदानाचे पुण्य देई । कायकूपिका तत् समई । दिधल पाहि जिनदत्ता ||२७|| ते घेवोन उठला त्वरे । घट पडला भूमीवरे । व्यर्थं गेले तेल सारे । चिंतातुर श्रावक जाला ||२८|| म्हणे सुवर्णतोला तेल । ते अवघे व्यर्थं गेले । ते तुकारिने पाहिले । अभय दिधले श्रेष्टिसी ॥ २९ ॥ तुर्यदानाचे देणार । दाता विरळा दानशूर | कल्पवृक्षसमान धीर । पुण्यानुसार धर्म्मवृद्धी ||३०||
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org