SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 464
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग तेहतीसावा : ४३९ मातृभातृ तो धनवान् । तया दिधले अभयदान । आन वस्त्रादि द्रव्यार्पण । अमोल रत्न अष्ट दिल्ही ॥३०॥ मातुळ म्हणे त्या दोघासी । जतन करा रत्नद्रव्यासी। समता धरावी मानसी । कुबुधिसी न आचरावे ॥३१॥ एके दिनि मातुळाज्ञेन । चालले स्वगृहमार्गान । द्रव्यलोभ दोजनमन । इच्छिति हान न एकमेका ॥३२॥ ऐसे कर्ता नग्रपर्यंत । क्षिप्रावती नदीत स्वस्य । दोघ करिती पश्चत्तापात । भय-अनर्थ द्रव्यापासी ॥३३॥ युगुळे विचार करोन । नदीत टाकिलि अष्ट रत्न । मत्स्ये खाद्य जानोन । गिळिलि रत्न वसुविध ।।३४॥ तेथे तो मत्छारि धीवर । पापिधारिते जळचर । त्याचा करिताचि विदार । आष्टकंकर देखियले ॥३५।। धीवरि घेवोनि तयासी । धनमित्राचे दुकानासी । धनमित्राचा मातेपासि । विक्रीत तिसि कर्मयोगे ॥३६॥ माता पुनासि बोलाऊन । हे काय परीक्षा करण । तुजसि असेल याचे ज्ञान । सांगोन देन आम्हासी ॥३७॥ दोघ सांगति सत्यमात । हे अमोल रत्न आहेत । त्रिवर्ग लोभ धरि चित्तात । एकमेकाचा घात ईच्छी ॥३८॥ पश्चात्ताप चित्ति करोन । जेष्ठपुत्रा दिधलि रत्न । तेनेहि लोभ धरोन । इछी हनन मातृभ्रातृ ॥३९॥ धनापासि महा अनर्थ । राज्यभय दंड न करीत । चोरभय प्राणहारित । पापि पापात का न करती ॥४०॥ तेव्हा त्यानि स्वयं चित्तात । बहु करिती पश्चात्तापात । द्रव्याचे लोभ प्राणघात । एकमेकात सखे बंधू ॥४१।। For Private & Personal Use Only Jain Education International www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy