________________
४०४ : आराधना -- कथाकोष
द्वारपाळ पाहे दूरोनी । त्वरित रायासी सांगोनि ! सूरत भूप पट्टराणी । सांगे जाऊन तयासी वेगी ||७|| म्हणे अहो हो महादेवी । भ्रामरि तयारी करावी । हेम कळस घेवोनि भावी । प्रासुक लोई उष्णोदक ||८|| दर्पण घेवोनिया हाती । तिलक शंगार करिती । रायाची ऐके वचनोक्ति । चंचलचित्ती जाहली ते ||९|| राजा पडघावि गुरुसी । त्रिवार नमोस्तु स्वामिसी । उदकशुद्धी द्वयकरासी । प्रक्षाळ पदासी उभयता ॥ १० ॥ हस्तशुद्धी सिद्धभवती । षड्स पक्वान्न वाढिती । निरंतर जाहले तृप्ती । नवविधभक्ती पुण्यात्मा ॥ ११॥ श्लोक : गाथा : पडिगहमुच्चठाणं । पादद्वयअच्चनंच पर्णमंच | मनवयकायसुद्धी | एसणसुद्धी नवहि पुण्णं ॥ १२ ॥ नवविध भावरी पुण्य । सूरत राजा महाधीमान । सर्वसुखाचे कारण । हेचि करणे बुद्धिवंत ॥ १३॥ श्लोक : दानपूजाव्रतोपेतः । शोभते श्रावकोत्तमः । तैविहीनो नरो नैव । भातीव निष्फलो द्रुमः || १४ || दानपूजा व्रत करोन । श्रावकोत्तम शोभायमान | जे नरभक्ती पुण्यहीन फळावाचून जेवि वृक्ष ॥ १५ ॥ तस्मात् दान विधापात्रासी । पूजा अष्टविधदेवासी । व्रत उपास चतुर्दशी । पुण्य रासी शक्तीनुसार ||१६|| महादेवी ते राजभार्या । नग्न देखोनि गुरूवर्या । ओठ नाक मुरडोनिया । पापनी वाया निंदा करी ॥ १७ ॥ निंदा पाप महादारुण । निंदामति सागर श्रेष्ठीन । कोट्यावधी धन जावोन । देशाटन गुणधर पूता ॥ १८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org