________________
३९२ : आराधना कथाकोष . त्रीचरित्र ब्रह्मा न जाने । विष्णु वृंदेसाटि कानने । महेश्वर तो भिल्लनीन । इतराचा कोन पाड करी ॥१०३॥ ते दोघे आली राज्यद्वारे । पंगु गायन करि सुस्वरे । नृपासि सांगति कौतुक थोर । आना भीतर श्रवण करू ।।१०४।। स्त्रीनेम असे तया राया। अंतरपट् बांधोनिया। गायनस्वर मंजुळिया । द्वैकर्णप्रिय मृग भुलले ॥१०५।। स्वत्रियेच वाक्य ऐकोनि । कंटाळा आला राया मनी । म्हणे धिक् स्त्रियाचि करणी । सती सिरोमणी म्हणावी ॥१०६।। हे पापिनी शीलवजित । शूद्रासी होउनिया रत । पंगु गवई याचकात । मिक्षा मागत फीरली गे॥१०७॥ धिक् रांड धिक् त्या स्त्रिया । पश्चात्ताप जाहला राया। वैराग्य चितिले हृदया । सोडिली माया राज्याची ॥१०८॥ तथा जयसेन स्वपुत्र । अयोध्याप्रती तो राजेंद्र । तयासी वर्तमान सर्वत्र । आला सत्वर भेटावया ॥१०९।। प्रधानरहित मिळोन । राजि स्थापिला जयसेन । द्धादशानुप्रेक्षा चितोन । दीक्षागमन वनांतरी ||११०॥ दमधराचार्य गुरूपासी । त्रिशुद्ध त्रिप्रदक्षिणेसी । महाविनयभावैसी । त्रिवारेसी पंचांग नमोऽस्तु ॥११॥ स्वामी तुम्ही भवसागर । कृपा करावी दीनावर । मस्तकी ठेवोनिया कर । पापाचा संहार तेच द्यावे ॥११२।। स्वामिराए दिधली दीक्षा । देवगुरू श्रावकसाक्षा । जैनधर्माची परीक्षा । जावया मोक्षा सुतप करी ॥११३॥ श्लोक : कृत्वा तप जिनेंद्रोक्तं, लोकद्वयसुखप्रदं । स्वर्गे देवोऽभवत् काले, महान्नानाद्धिमंडितः ।।११४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org