________________
३२८ : आराधना-कथाकोष
तदा धनकीर्ति कुमर । पूर्वपुण्यकरोनि प्रचुर । स्वश्रूगृहासी आला लौकर । श्रीदत्त सासुर वदे तदा ॥२९॥ त्वरे काहो आलेत करोन । न करीता देवीपूजन । हे काय तुमचे शाहानपन । ममाज्ञा भंगुन आला कसा ॥३०॥ तदा वदे सासु-याप्रति । मामाजी मद्वाक्य ऐकावे सति'' । करी घेवोनि आरति । पूजाया देवात जात होतो ॥३१॥ निघता ग्रामाचे बाहिर । मार्गे भेटला त्वत् कुमार । तो क्रोधे प्रजलला मजवर । वाक्य मनोहर वदे ॥३२॥ म्हने अहो हो जामात । संध्यासमइ तमव्याप्त । कासिया जाता वनात । सध्या प्राणांत होइल ॥३३॥ शरीरि हरिद्रिका चर्चुन । करी बांधिलेसे कंकण । येकले न जावे आपन । घेतील प्राण भूत राक्षस ॥३४॥ देविपूजनाचि विधि । त्वा नाहि जानितालि कधि । त्याजवरि हीनबुद्धि । तो काय सुधी अचिल ॥३५॥ यास्तवे त्वया फिरावे माग । मम भाष्य पित्यालाजि सांग। जरी तुजवरि करील राग । मम नाव सांग त्याजपासि ॥३६॥ ऐसे वदोनि कुमर बळि । मम करीचि घेवोनि थाळि । पांघरोनि मम कांबळि । चंडिकादेउळि गेला त्वरे ॥३७॥ मजवरि न करावा रोष । क्वचित् नसे मम दोष । सर्व पुसावे कुमरास । जेव्हा गृहास येईल ॥३८॥ तदा तो श्रेष्टी श्रीदत्त । कुमराचि ऐकोनि माता । हृदय पावला थोर दुःखित । अग्ने कार्यात विचारिति ॥३९॥
११. कणि.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org