________________
३२६ : आराधना-कथाकोष जगी तेच वरीष्ट नारि । जे स्वामिचे सांगितले करि । कुलवान् पुत्र पृथ्वीवरी । पितृ आज्ञा निरंतर पालिति ॥८॥ या धनकीर्तिपुत्राकारणे । विषया कन्या सिघ्र देने । करोनिया मानदाने । न निरीक्षणे मम मारग ॥९॥ लग्न शोधोनि पाठविल्यावर । महोत्सवे करोनि थोर । कन्या देइजे सत्वर । विवाह गजर करोनिया ॥१०॥ स्वज्ञाने ऐसे लिहोनि । त्याचि मुद्रामाजि घालुनि । तयाचे कंठी बांधोनि । स्वकिय स्थानि गेली त्वरे ॥११॥ तदा कुमर धनकीति । त्वरे उठोनि निद्रांति । जावोनि श्रेष्ठीचे गृहाप्रति । तत् सुताहाति पत्र दीधले ॥१२॥ लिहिला मजकूर वाचून । मातापुत्राचे हर्षले मन । विषया कन्या दिल्ही पणुन । थोर करोन महोत्सव ॥१३॥ ज्याचे प्राक्पुण्य असे थोरी । त्यासी काय करिति वैरी । कंदुकमृत्तिकापिंडापरि । चतुर निजांतरि जानिजे ||१४॥ उक्तं च : पडोनि उसळे पुन्हा त्वरित ऊर्ध्व चेंडू जसा। वरीष्ट नर भूतलि पतनभाव लाभे तसा ॥ नुठे च पडल्या पुन्हा, त्वरित मृत्तिकापिंड तो। कनिष्ट समजा तसा पतन पावल्या नासतो ।।१५।। ते मात कळलि श्रीदत्तात । क्रोधे खवळला अद्भुत । त्वरे आला धावत । कराव्या घात कुमराचा ।।१६।। त्यान नपाचे बाहिर थोर । होते चंडिकाचे मंदिर। माजी बसविले युग्मनर । कन्यावर वधावया ॥१७॥
४. न उठे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org