________________
प्रसंग दुसरा । ३१७
तदा विचारि स्वमानसि । म्हने आता जावे दूरदेसि । जरी राहाता या ग्रामासि । कन्या दृष्टासि देने येइल ॥२०॥ तदा त्या धनाश्रिय कारण । श्रीदत्तश्रेष्टीचे गही जान । प्रसूत काल समीप जानून । दिधलि ठेऊन तद् गृहि ॥२१॥ गुनपाल आणि श्रीदत्तश्रेष्टि । उभयता फार असे प्रीति । बालमित्र म्हनविति । रत असति जिनर्मि ॥२२॥ भार्या ठेवोन त्याचे घरि । द्रव्य कन्या घेवोनि सत्वरि । गूढवृत्ति करोनि चातुरि । देशावरि असे चालिला ॥२३॥ सोडोनि तयाचा देश । जावोनि कौसाबि ग्रामास । करिता झाला आवास । धार्मिक नृपास भेटोनिया ॥२४॥ शकट वाजि गजवर । आनि पापिष्ट दुर्जन नर । याहापासोनि असावे दूर । न तरि देशावर जाइजे ॥२५॥ उक्तं च । शकटात् पंचहस्तेषु, दशहस्तेषु वाजिनः । हस्ती हस्तसहस्रेषु, देशत्यागेषु दुर्जनात् ॥२६॥ तो गुणपाल श्रेष्टि भला । जिनधर्मश्रेष्ट करू लागला। राजश्रेष्टी पद पावला । वंदनिक जाला सर्वजना ॥२७॥ कौने एकिय दिवसि । श्रीदत्त श्रेष्टीचे गृहापासी । निर्धन श्रेष्टि वसे गुणरासि । दानपूजाकार्यासि तत्पर असे ॥२८॥ त्याचे पुण्योदय करोनि । मासोपवासी युग्ममुनि । शिवगुप्ति गुप्ताचार्य जानि । भावरिलागुनि उतरले ॥२९॥ येता पाहिले मुनीश्वर । मासोपवासी ज्ञानभांडार । आनंद मानोनिया थोर । विधिवत् सत्वर पडगाहिले ॥३०॥ नवधा पुण्य करोन । सप्तगुणे सहीत जान । शुद्ध प्रासुक मिष्टान्न । आहारदान दिधले ॥३१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org