________________
प्रसंग बाविसावा ! २९१
तद्वाक्य ऐकोनि खवळिले । गृहामाजि प्रवेशू लागले । तदा त्या निर्जराने भले । बाहिर घातले मारोनिया ॥१४०॥ तदा माया-युद्ध करोनि । मूगित पाडिले धरणि । ऐसे कळले नृपालागुनि । थोर क्रोधाग्नि हृदि पेटलि ॥१४१॥ तदा फार धाडिले दूत । आज्ञा केलि सर्वाहित । धरोनि आना रे त्वरित । धनदत्त श्रेष्ठिप्रति ॥१४२।। तदा धाविले राजकिंकर । वेढिले श्रेष्ठीचे मंदिर । द्वारी बैसला पाहोनि नर । सर्वे त्याजवर शस्त्र टाकिति ॥१४३॥ तदा देवाने एकवेळि । सर्वे पाडिले भूमंडाळ। मायानिद्रा टाकोनि सबळि । कृत निर्बल सर्वे मूछित ।।१४४॥ शीघ्र जावोनि राजकिंकर । विनविला नरेश्वर । म्हणे जी आपले सुभटनर । सर्वांचा संहार एकेचि केला ॥१४५॥ तद्वाक्य करोनि श्रवण । महत्कोपारूढ होउन । चतुरंग सैन्य घेउन । त्वरे आपनचि निघाला ॥१४६॥ सैन्य सहित पाहोनि भूपति । मायायुद्ध करोनि युक्ति । सर्वे सुभट पाडिले क्षिति । प्राणमुक्ताकृति दिसे काया ॥१४७॥ एकला उरला असे भूप । देवान कृत महत्कोप । कोठी जासी रे पापरूप । मत्प्रताप स्वल्प तुजा निसि ।।१४८।। नृप ऐकोनि तद्वैखरी । महत्कंप सुटला शरीरि । राख राख वदने उच्चारी । शीघ्र जिनमंदिरि पातला ॥१४९॥ जावोनि श्रेष्ठीचे जवळी । मस्तक ठेवोनि पादकमळी । गद्गदोक्ति वदे मुख निर्बलि । म्हणे मम कष्ट टाळी कृपाळा ।। तदा एक नर पाहिला दृष्टि । करी धरोनि स्थूल यष्टि । लागला असे नृपाचे पुष्टि । वदे श्रेष्टि तयाप्रति ॥१५१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org