________________
प्रसंग बाविसावा : २८९ आता धर्मध्यानि लाउ या प्रति । जेन्हे होय स्वर्ग-गति । ऐसे विचारोनि चित्ति । श्रेष्ठी त्याप्रति वदतसे ॥११॥ गुरुसेवा करिता आज । द्वादश-वत्सर झाले मज । तेन्हे प्राप्त झाला मंत्रराज । जेन्हे मज काज सिद्धि होय ॥११७॥ जरी जाईन जलाकारण । मंत्र जाईन विसरून । पुनः प्राप्त नव्हे जान । सागरि रत्न पडल्या जसे ॥११८॥ मी जल घेवोनि ये जवरि । मंत्र रक्षिशील वदनांतरि । मग घेवोनि माघारी । शीतल जल सत्वरि पाजिन ॥११९॥ तस्कर वदे गा दयासागर । मज मंत्र वदोनि सत्वर । आणोनि पाजावे सीतल नीर । तव मंत्र तुज देइन ॥१२०॥ ऐसे भय दाखवोनि । नौकार मंत्र देउनि । जाता झाला जिनभुवनि । कृत जिनचरणी वंदना ॥१२१॥ प्रदक्षिणा देवोनि त्रिविध । सामायिक करिति त्रिकरणशुद्ध । चउषष्टि दोष निरुद्ध । करोनि विबुध समताभावे ॥१२२।। उक्तं च- समता सर्वभूतेषु संयमे शुभभावना । आर्तरौद्र परित्यागस्तद्धि सामायिकं व्रतं ॥१२३॥ श्रेष्ठीचे भय मानोनि चित्ति । नौकार स्मरिता दृढभक्ति। तत्क्षणि पावला प्राणमुक्ति । विकलचित्ति स्थिरता कैचि ॥१२४॥ तदा नौकारमंत्राचे फळे । सौधर्मस्वगि त्याचि वेले। अवतरला माजि संपुष्टशिले | पुण्याचे बले महद्धिक ॥१२५॥ अहो त्रिलोक्यामाजि सार । सर्व मंत्रामाजि थोर । मंत्र असे पंचनमस्कार । वर्णावे कोठवर माहात्म्य ।।१२६।। तस्कर आनि श्रेष्टीने । एकदा केले जे भाषण । ते पाहोनि एक दुष्टजन । नृपासि निवेदन केले त्वरे ॥१२७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org