________________
२८४ : आराधना-कथाकोष तेथे धनाढय वसति जन । जिनधर्म करिति आचरण । नित्य जिनमंदिरि जाउन । न्हवन पूजनानंदे करिति ।।५७॥ तया नगरीचा राजा । धनपाल नामे असे वोजा । तनुजवत्पालति प्रजा । स्वात्मकाजा प्रवर्तला असे ॥५८|| देशांतरि व्यापला प्रताप । वैरिगणावरि महत्कोप । राज्य करिति निष्पाप । मोडिति व्याप अधर्माचा ॥५९|| तयाचि राज्ञि असे धनवती । रूप लावण्याचि क्षिति । महासाध्वी शीलवती । स्वामिसेवाभक्तितत्परा ॥६॥ नृपासवे करिति धर्म । गृहस्थाचार षट्कर्म । भवभवि व्हाव्यालागि शर्म । न वदे मर्म वाक्य कदा ॥६॥ भोग भोगिति नृपासंग । क्रीडा करिति नाना रंग । कदा प्रीतिचा नव्हे भंग । आंगोपांग सहित तपिले ॥६२॥ राज्य करिता मनोह्लास । शीघ्र पावला वसंतमास । थोरानंद मदनभूपास । स्वसंपत्तीस पाहोनिया ॥६३॥ आम्रतरुच्या अम्रकल्पा । भक्षण करिति कोकिळा । वचन वदति मंजुला । कर्णमंडला प्रीतिदायका ॥६४॥ पुष्पवाटिकामाजि सार । नाना जाति मनोहर । पुष्प उगविले सुगंध थोर । करिति झुंकार षट्पदे ॥६५॥ थोर संपदासहित वन । सोभति पुष्पफलेकरून । वनपाल नृपात जाऊन । निवेदन कृत त्वरे ॥६६॥ या तुझे उद्यानवनि । सर्व संपदासहित येउनि । वसंतरायाने केली छावणी । आडंबरे करोन उतरला ॥६७॥ नानाप्रकारे तरुवर । पुष्पफले पावले नम्र । पुष्प उगविले प्रकर । जेथे भ्रमर करिति गायन ॥६८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org