________________
२८२ । आराधना कथाकोष
जरी जाता वेळे प्राण । मंत्रराजाचे करावे ध्यान । पूर्व पापाचि करोनि हान । स्वर्गी जाऊन सौख्य भोगिति ॥३३॥ हा मंत्र जपता थोरी । वनी रणी साह्यकारी। जलाग्नि बुडता सागरी । सिंधु तारी मंत्रराज ॥३४॥ व्याघ्रसिंहादि क्रूर जीव । सहज पावति शांत भावः । कदा न गांजिति दुर्जनराव । मंत्रप्रभाव करोनिया ॥३५॥ जरी पर्वतावरोनि पडे । शरीरी क्वचित् बाधा न घडे । ठग नर जयासि न नाडे । मंत्रराज लडबडे ज्याचे हृदि ।।३६॥ भूत प्रेत वेताळ । चंडी मुंडी क्षेत्रपाळ । राक्षसादि महाकाळ । जयाचे पदकमल वंदिति ॥३७॥ ऐसी मंत्रराजाचि महिमा । कोण वर्णी तयाचि सीमा । पापी जीव उद्धरले नाना । सौख्यधामा पौचविले ॥३८॥ ते महिमा ऐकोनि भूपति । वदता झाला वचनोक्ति । या मंत्रेकरोनि स्वप्राप्ति । प्रगट्या क्षिति कोन पावले ॥३९।। ते कृपा करोनि देवराया । सभाजनासि वदावे त्वया । भव्यजन श्रवण करोनिया। मंत्रराज जपाया दृढ होति ॥४०।। तत्प्रश्न ऐकोनि सन्मति । वदे गा श्रेणिक भूपति । सभासहित एकचित्ति । मंत्रफलश्रुति आइका ॥४१॥ मालवे देशामाझारी । उज्जयनि नाम असे नगरि । वनोपवने शोभा भारी । बागाइत विहिरि मनोहरा ।।४२!। जंबूदाडीम वृक्ष प्रकर । जांब सहतुते मिष्ट फार । कम्रख कईली मनोहर । असे फार वृक्षावलि ॥४३॥ कपित्थ वृक्ष आनि चिचिनि । एरंड पोपइ मधुर खिरणी। अम्र खजूरादि करोनि । वृक्ष उपवनि शोभति ॥४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org