________________
प्रसंग बाविसावा : २८१
पंच परमेष्टी पंच पद । मन-वच-काया करोनि शुद्ध । स्मरण करिति जेवि बुध । ते अक्षय पद पाविति ॥२१॥ अहंत सिद्ध आणि आचार्य । महाज्ञानी उपाध्याय । पंचम साधु मुनीराय । स्मरत असावे सदा हृदि ॥२२॥ छत्तालिस गुण करोनि सहित । अष्टादश दोष रहित । समवशरण विराजित । वदावे अहंत तयाप्रति ॥२३॥ जे त्रैलोक्याचे शिखरी । अष्टगुणासहित थोरी । जन्म-जरा-मृत्यु करोनि दूरि । अनंतसौख्य निरंतर भोगिति ॥२४॥ जे छत्तीस गुणे करोन । नित्य असति विराजमान । आचार्यपदे त्याकारण । असे पावन जनतारक ॥२५॥ जे अंगपूर्व नित्यपढति । शिष्यवर्गासि पढविति । ते उपाध्याय म्हणविति । भव्य जनाप्रति तारक ॥२६॥ मूलगुण जे अट्ठावीस । नित्य पालिति मुनीश । सर्व साधू नाम तयास । तपे सिवसौख्यास साधिति ॥२७॥ हे पंच परमेष्टी पंचपद । पस्तीस अक्षरे करोनि शुद्ध । नित्य जपति जेवि बुध । ते सौख्य निर्बाध भोगिति ॥२८॥ प्रथमपदाचे सप्ताक्षर । द्वितीय पंच मनोहर । सप्त सप्त नव प्रकार । भवसागर ताराया समर्थ ।।२९।। उक्त-दुहा-प्रथम अक्षर सात गणो, पाच गनो मन लाय ।
सात सात नव अक्षरा, गणत पाप मिट जाय ॥३०॥ हा अपराजित महामंत्र । त्रैलोक्यामाजी पवित्र ।। त्रिकर्ण करोनि एकत्र । जपावे सर्वत्र शुद्धभावे ॥३१॥ पवित्रपवित्र असे काया । वा पीडित दुःखे करोनिया । घोर कष्ट पडति येवोनिया । तरी न कीजे हृदयावेगळे ॥३२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org