________________
२ : आराधना-कथाकोष
आप्त' भारती आनि सद्गुरु । तत्क्रम नित्य हृदइ स्मरु । कथाकोश ग्रंथारंभ करू । असे आधारू त्वत्पंकजाचा ॥८॥ श्री मूलसंघे भारतिगच्छे । बालात्कार गण दिसे स्वच्छ । श्री कुंदकुंदान्वये कक्ष । ज्ञानार्णवि' दक्ष प्रभाचंद्र ।।९।। तत्प्रभाचंद्र मुनिश्वरान । श्रावक अनुग्रहाकारण । आराधना' सारकथा कठिन । प्रबंध करोन निर्मिला असे ॥१०॥ विचारोनि तत्कथा अर्थ । स्वज्ञाने करोनि नेमिदत्त । श्लोकबद्ध रचिला ग्रंथ । पुण्यअर्थ प्राप्त व्हाया ॥११॥ आराधना कथाकोश । नाम असे या ग्रंथास ।। श्रवण करोनि रत्नकीर्तिस । हृदि उल्हास दाटला ॥१२॥ तदा भासिले मम चित्ति । सार कथाकोश उत्पत्ति । करावि परी मी मंदमति । न जाने युक्ति कवित्वाचि ॥१३॥ ऐसे जानोनि राहिलो स्थिर । परि चित्ति उत्कर्ष असे फार । हर्ष उद्भवे वारंवार । बालबोध सार रचायासि ।।१४।। ऐसी निशिदिन करित चिंता । भरवसा न वाटे मम चित्ता। तत्क्षणी स्मरिलि जगन्माता" । मम मूर्खता दूर गेली ।।१५।। मग विचारिले स्वचित्तास । भारति दिधले साहस । रचाया आराधना कथाकोश । प्रासाद कलस सिद्धि होईल ।।१६।। आराधना कथाकोश जान । या ग्रंथाचे असे अभिधान । चतुर्भेदे करोनि पावन । ज्ञानवंत निर्मान केले असे ।।१७।। १. अहंत देव, २. पादकमल, ३. निर्मल, ४. पट्टावलि, ५. समुद्र ६. दर्शनाराधना, ज्ञानाराधना, चारित्याराधना, तपाराधना. ७. ब्रह्म (ज्ञाने): ८. कषारूपी भांडार, ९. आवडलि, १०. सरस्वति.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org