________________
प्रसंग अठरावा
श्री देव-शास्त्र-गुरू वंदू । पंचपरमेष्टी-ज्ञान-सिंधू । विनाकारण जगबंधू । त्रिकाळ विवीधू नमोस्तु ते ॥१॥ माय माझी शारदादेवी । कवित्व कला मार्ग दाखवि । वरदहस्त मूनि ठेवि । कृपा करावी दीनावरि ॥२॥ प्रसन्न होवोनि सरस्वती । अभय दिधले मजप्रति । ग्रंथ करावा हर्षचित्ति । ज्ञानस्फूर्ति भारती माय ॥३॥ दीनदयाळ मम गुरुराय । तरणतारण त्याहाचे पाय । त्याहाचे कृपेन ज्ञान होय । दाखवि सोय कवित्वाचि ॥४॥ तत्पदकमळ स्मरूनि । ग्रंथरचना म्हराष्ट्रवानि । श्रोते द्यावे अभयपाणी । कथाश्रवणी सादर पै ॥५॥ जंबूद्वीपात सुदर्शन मेर । त्या दक्षिणदेशि भरतक्षेत्र । देशात मागधदेश पवित्र । पुण्यक्षेत्र तीर्थभूमिका ॥६॥ पुरे खेट आनि नगर । धार्मिक वसति मनोहर । सर्व सुखी पुण्यानुसार । क्रिया-आचार-विचारादि ॥७॥ ऐसा देश पुण्यपावन । त्यात राजगृही विस्तीर्ण । वापि-कूप-तडाग मनोज्ञ । वन उपवन शोभति ।।८।। दुर्ग खातिका भयंकर । ग्रामदुर्ग ज्या अति सुंदर । हाट-चौहाट-माडया-गोपुर । दुकानि सावकार शोभति ।।९।। त्याचे मध्यभागी विस्तीर्ण । चैत्यालय शोभे मेरूसमान । . पताका करिति अवलंबन । सम्यक्त्वजनभाविका ॥१०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org