________________
प्रसंग सतरावा
अथ ब्रह्मदत्त चक्रवर्ति कथा
अहंतसिद्धाचार्य मुनि । पाठक साधूचे चरणि । नमन मम असे निसिदिनि । काव्यालागुनि कार्यसिद्धि ॥१॥ माय माझी सरस्वति । तव पदि मम नुति । अज्ञानासि देइ मति । कथेप्रति करावया ॥२॥ तरनतारण गुरूराय । सदैव सेवू तयाचे पाय । जयाचे प्रसादे ज्ञान होय । अज्ञान जाय पळोनिया ।।३।। आर्यखंडामाजि सार । कपिला नगरी असे सुंदर । खातिक प्राकार गोपुर । वेष्टित चौफेर शोभति ।।४।। तयाचे भवते उद्यान । वृक्ष फळ पुष्प संपूर्ण । वापिका वाटिका करोन । सोभायमान फार दिसति ।।५।। जेथे धनाढय लोक नांदति । जिनधर्मावरि थोर प्रीति । न्हवन पूजन नित्य करिति । दान देती मुनीश्वरा ।।६।। त्या नगरीचा नृपवर । ब्रह्मरथ नामे असे थोर । प्रताप असे पृथ्वीवर । नित्य जिनवरधर्म करिति ।।७।। रामील्या नामे करोनि । नृपतीचि असे रानि । रूपमौभाग्याचि खानि । प्राणाहोनि वल्लभ असे ॥८॥
...................
१. बाडी.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org