________________
२०४ : आराधना कथाकोष
तदा तो वदे सेवकाहित । का रे पाहिला मुनिनाथ । भक्ताभक्ताठाइ एकचित्त । निस्पृहि शांत उदासवृत्ति ॥७६।। मेरुसमान असे धीर । सागर समान गंभीर । कर्मवैरि जिंकाया वीर । क्षमेचा भांडार धरासम ॥७७॥ हे असता जयाचे भक्त । न कथिला आपुला वृत्तान्त । उदकतुल्य मुनींद्रचित्त । दिसति व्यक्त सर्वाठाइ ॥७८॥ ऐकोनि सूरदत्तोक्ति श्रोत्रि । क्रोधाग्नि पेटलि शरीरि । म्हने हा पुत्र नव्हे वैरी । नवमास उदरि व्यर्थ वाहिला ॥७९॥ महद्वैरी मज दिसे उदर । गर्भपात केला नाहि लौकर । बंधू छूरिका द्यावि सत्वर । फाडितो उदर महत्शत्रु ॥८॥ तद्वाक्य ऐकोनि चौराग्रणि । वदे हे असे रे मुनींद्र जननि । कन्याद्रव्य द्याव्य फिरोनि । मुनिमाता जनि वंद्य असे ॥८१॥ इचे चणि करा वंदना । पाप जोडिले असति नाना । ते तुटतील एके क्षणा-। माजि जाना मद्वाक्य सत्य |८२।। सूरदत्तवाक्ये ऐकोनि सर्वे । तयाचे पद वंदिले भावे । आर्पोनि कन्या आनि द्रव्ये । पौचविले सवे जावोनिया ॥८३॥ तो सूरदत्त चौराग्रणि । ऐसे कारण पाहुनि । वैराग्य पावला मनि । म्हने म्या प्रानि फार वधिले ||८४॥ जन्म घेवोनि उत्तम वंसी । नाचरिले व्रतनेमासि । थोर जोडलि पापरासि । दुर्गति दुःखाचि कारण ||८५।। ऐसे करिताचि चिंतन । वैराग्य उद्भवला द्विगुण । नागदत्त मुनिसान्निध जाउन । दिक्षाग्रहन शीघ्र केलि ॥८६॥
७. भक्त-कुभक्त.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org