________________
१९४ : आराधना कथाकोष
ते पाहोनि दिवाकरदेव । सामर्थ्ये विद्येचे प्रभाव | रथ न सोडितोचि ठाव । करिति उपाव राव रानि ।। १७६॥ मिथ्यामति महाबळि । वोढिता मोडोनि पडला तलि । खोट्याच्या घाव कपाळ । सत्य सांभाळि पुण्यवंत || १७७ || जैजैकार जिनधर्माचा । गर्व हरिला मिथ्यामतिचा । काम गळाला राजियाचा । जाला धर्माचा निश्चय ।। १७८ ।। अनंद झाला सर्वा मनि । देव विमानि बैसोनि । पुष्पवृष्टि गगनिहुनि । करिति मेदनि खगेंद्र ॥ १७९ ॥ वाद्ये वाजति अपार । रथ चालतसे स्थिर स्थिर । शोभताति छत्रचामर । पताका जर्तार पालविति ॥ १८० ॥ गंधर्व गायन नृत्य करति । कामिनि मंगलगान गाति । उविलारानि ऽनंद चित्ति । दाने तृप्ती याचक सर्व ॥ १८१ ॥ ऐस्यापरि रथ महोछ्व । पाहोनिया जन सर्व । वदति धन्य धर्मवैभव । विद्याधर देव साह्य होति ॥ १८२ ॥ धन्य देवात प्रतिमा । वज्रकुमार गुरूचि महिमा | धन्य भव्य लोकोत्तमा । यासि उपमा अनुपम्ये ।। १८३ || ऐस्यापरि रथ मिरवत । सज्जनमनानंद बहुत । उविला राणिचा मनोरथ । यथास्थित पूर्ण जाहाला ॥ १८४ ॥ सर्व नग्रीत रथ मिर्वोनि । आले अपुले स्वस्थानि । मंगळारति दीप उजळुनि । करि घेवोनि बोवाळिति ॥ १८५ ॥ वाद्ये वाजति अपार । विमानारूढ विद्याधर ।
T
जै जै शब्दाचा महागजर । वोवाळणि अपार वोवाळिति ॥ १८६॥ कर्पूरजोति लावोनिया । शुद्ध करि मनक्चन काया । आरति करा देवपाया । पाप विलया जाति सर्वं ॥ १८७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org