________________
प्रसंग तेरावा : १८३ तेव्हा तो नाभिगिरिवर । आतापनयोग धरि धीर । कर्माचा करि संहार । तपस्वी शूर प्रतापिया ॥४४॥ तेव्हा ते यज्ञदत्ता ब्राम्हणि । पुत्र प्रसवलि सद्गुणि । मतिज्ञान सुंदरवाणि । सर्वाचे मनि परमानंद ॥४५॥ ऐसिया आनंदाचे वेळ । भ्रतार वार्ता ऐके सकळ । हृदइ दुःखाचा कल्लोळ । क्रोध अनिल धडाडिला ॥४६।। दीर्घस्वर करि रूदन । मुखे वदे अनित्यवचन । घात केला गे भ्रतारान । वैर साधुन गेला बाई ।।४७।। ऐसे करण होत माय । तरि कां ग गोविलि गाय । आता या पोरटयास करू काय । करि अतिशय अनिवार ॥४८॥ मायबाप म्हनति बाइ । शोक करू नको सइ । बाळकावरि दृष्टि देई । शांत होइ गे ज्ञानवंते ॥४९।। बंधु स्त्रिया मेळा मिळाला । म्हणति कैसा घात झाला । पूर्वकर्म वैर साधला । स्त्रियाच्या बोला कोन पूरे ॥५०॥ यज्ञदत्ता बोले बंधुसि । क्रोधे जल्पतसे मानसि । म्हणे हे पोरटे तयासि । ज्याचे त्यासि द्यावे त्वरा ॥५१॥ ऐसे वदोनि सत्वर । निघाले बंधु समग्र । येवोनिया पर्वतावर । देखिले भ्रतार स्त्रियेने ॥५२॥ रुदन करि देहलोभि । तयासन्मुख राहे उभी । अनिष्टवचने बोले वल्लभि । जेवि सुल्लभि ग्रामसिव्हि ॥५३॥ यज्ञदत्त दुष्टस्त्रिया । म्हणे रे रे त्वा पापिया। मज का प्रनिल व्यर्थ वाया । घातकिया निर्दय मन ॥५४॥ मी जेव्हा गभिनि जाहालि । तेव्हा प्रीत माझि धरलि । ज्याकाळि आम्रफळ दिधलि । दिक्षा घेतलि मज टाकुन ॥५५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org