________________
१५२ : आराधना-कथाकोष
पूर्ण करोनि योग अवधि । सोधन करित ईर्याशुद्धि । प्रवेश केला ग्रामामधी । एषणाशुद्धि पश्यति मुनि ॥९०॥ तेथे नृपाचा मंत्री वसे । अग्निभूति जिनर्मि असे । तप घेवोनि साधिले मोक्ष । अनंतसौख्य भोगे त्यास्थळि ॥९१॥ तयाचा पुत्र पुष्पडाल । वारिसेन होता जेव्हा बाळ । तेव्हा नानाविध खेळ । वनादिजलक्रीड करिति ॥१२॥ मुनि म्हने हा मद् बालमित्र । जानहीन दिसे मंत्रीपुत्र । मोहांध होवोनि दिनरात्र । अपवित्र गृहि असे तिष्टला ॥९३॥ आता हा बुडता भवजलि । धरोनि धर्मकरकुङमलि । दया आनोनि हृत्क मलि । करावे बलि या निर्बलासि ||९४।। मग जाता झाला तद्गृहासि । तेन्हे येता पाहिला रुषी । थोरानंद पावला मानसि । लवलाहेसि उठला ॥९५॥ शुद्धोदक घेवोनि करी । त्वरे तिष्टला निजद्वारी । तिष्ट तिष्ट वदोनि सत्वरि । क्षपिले तत्करि प्राशुकजल ॥९६॥ बैसवोनि उंच स्थानि । उष्णोदके क्षाळिले पद दोन्हि । पूजानमनकृत त्रिकरणी । एषणाशुद्धि मिल्वोनि पुण्यनव ।।९७|| उक्तंच । गाथा-पडिगहमुच्चट्ठानं पादोदक अंचणं च पणमं च ।
___ मणवयकायसुद्धि एसणसुद्धि णवविहं उणं ॥९८॥ सप्तगुणे करोनि सहित । पुष्पडाल मुनीश्वरात। सुद्ध प्रासुक रसयुक्त । अन्नदान स्वहस्त देत असे ॥९९।। उक्तंच । श्रद्धाशक्तिश्च भक्तिश्च ज्ञानं दयामलुब्धता।
क्षमा सप्तगुणा यत्र स दातार प्रशस्यते ॥१००॥ मासोपवासि होता मुनि । निरंतराय होवोनि मुनि । अक्षयदान बोलोनि वचनि । चालिले तेथोनि वनाप्रति ॥१०१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org