________________
१३८ : आराधना-कथाकोष
पंचमति तापसि फार । कुज्ञान फैलाविति थोर । कुविद्येचा चमत्कार । भाविकजन न जानिति ॥३४॥ न जानोन त्या श्रेष्टिन । अंतर्गहि त्यास नेवोन । देवपूजेचे असे स्थान । बहुसन्मान बसविले ॥३५॥ शेषशाई दूर देखिले । हेम सिंहासनि शोभले । वैडूर्य रत्न तेज फाकले । नेत्र दीपले क्षुल्लकाचे ॥३६॥ वारंवार पाहे त्यात । स्फुरत्कीर्ण पारिखनाथ । चक्षुळाकोनि गोष्टि सांगत । कपटि मनात हर्षला ॥३७॥ तदा तो श्रेष्ठि शुद्ध मन । मुनिश्वर आहारक्रिया जान । प्रासुक जळ शुद्ध आणुन । कायाक्रिया करण स्वामिजी ॥३८॥ तेव्हा तो कपटि वेशधारि । मनामध्ये विचार करि । मौन्य धरोनि वैखरि । मैदापरि आर्तध्यानि ॥३९॥ श्रेष्ठी विनवि कर जोडोन । अम्हि संसारी अज्ञान । न कळे मौन्याचे कारन । काय म्हनोन वलखावे ।।४०।। मग तो बोलला उत्तर । दाखवि ज्ञान चमत्कार । स्नान न करिति मुनीश्वर । दया अंतर षट्काय ॥४१॥ श्रेष्ठि म्हणे सत्यस्वामी । करपाद प्रक्षाळु अम्ही । प्राशुक आहार घ्यावा तुम्ही । ममाश्रमि गुरुराया ॥४१॥ नमन करोनि स्वामिसि । प्रक्षाळिले करचरनानि । मग बैसले सामाइकासि । जपमाळेसि मौन्यमुद्रा ॥४३॥ श्रेष्ठि शुचिर्भूत होऊन । अष्टविध द्रव्य प्रक्षाळून । स्वहस्त देवपूजा करोन । नित्यनेम संपूर्ण जाहला ॥४४॥ मग आहारदानाचि युक्त । श्रेष्ठि जाने समस्त । नमस्कारोनि गुरुरायात । भ्रमरिकृत्यपाचरि ॥४५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org