________________
प्रसंग दहावा । १३७ ऐसा कोन्हि सामर्थ्यवान । सेठीचे मंदिरासि जावोन । सप्त पडद्याचे आतून । आनि चोरून रत्नबिंब ॥२२॥ त्यास देइन मन इच्छित । प्रधान मुख्य करीन त्यात । तस्करविद्येचे सामर्थ्य । तोचि कार्यात करील ।।२३।। सूर्प नाम तस्कर श्रेष्ठ । तो बोलला महाधीट । शक्र मस्तकीचा मुगुट । आणीन कपट करोनिया ॥२४।। ऐसे वदोनि दुराचारी । तदाज्ञा वंदोनिया सिरि । निघाला नगराबाहेरी । विचार करि मनामध्ये ॥२५॥ म्हने तो श्रेष्ठि धर्मवंत । कैसा होइल रिघ तेथे । त्याचे गुरु वंद्य त्यात । त्या भेषात धरावे अता ॥२६॥ ब्रह्मचारी वेष धरून । विद्यापठन कार्याकारन । रत्नप्रतिमेचे लागले ध्यान । जैसे विद्रावन फल साजर ॥२७।। पर्वतिथि करि उपास । लोका दाखवि कायाक्लेस । शरीर करोनिया कृश । मनि हर्ष कपटबुद्धि ॥२८॥ ऐसा विहार करित । नगरग्रामपूर हिंडत । रत्नप्रतिमा असे जेथ । त्या नगरात देखिले ॥२९॥ तामलिप्त पूर सुंदर । पुण्यवंत नांदति नर । स्वामि येताचि बाहेर । आले सत्वर दर्शनासि ॥३०॥ श्रेष्ठी जिनेंद्रसद्भक्त । वंदना करोनि विधियुक्त । धूर्तवेसि काया अशक्त । चारित्रयुक्त पाहिला ॥३१॥ आशीर्वादार्थ ऐकोन । श्रेष्ठी संतोष होऊन । विनयभक्तिस्तुति करोन । स्वगृहासि नेवोन स्थापिला ॥३२॥ आहो जे कामातुर नर । कोन जाने त्याचे अंतर । ज्ञानिध्यानि महाचतुर । नदीतीर बगळा जैसा ॥३३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org