________________
११२ : आराधना-कपाकोष पाक निष्पत्ति जाली जानुन । जिनदत्त प्रियदत्तादि करून । सर्वासि आला घेऊन । बहुमान करोनिया ॥९३॥ पानि जोडोनि सर्वासी । उठविले भोजनासी। भोजन करोनि स्वच्छ मानसि । चतुष्कासि पाहु लागले ॥१४॥ तदा श्रेष्टी प्रियदत्त । म्हने मत्कन्याचा दिसे हात । स्मरण करिता चित्तात । हृदी दुःखित थोर झाला ॥९५।। तत्क्षणि जिनदत्ताकारण । वदे हा चतुष्क काढिला ज्याहान । त्याहासि यावे शीघ्र घेउन । वळखीन निज कन्याप्रति ॥९६॥ प्रियदत्त वाक्य ऐकोनि । जावोनि अजिकाचे स्थानी। अनंतमतीसि आला घेउनि । पिताने नयनि कन्या पाहिलि ।।९।। कन्यासि पाहोनि सत्वर । नेत्रि लोटला आश्रुपुर । उठोनिया झडकर । कन्या मनोहर आलिंगिलि ॥९८।। म्हने दुहिते तुजकारणे । हरिले कवने दुर्जनाने । ममालय करोनि शून्य । सज्जना कारने दुक्खित केले ॥९९॥ तदा अनंतमतिने भले । जे जे दुःख साहिले। ते सर्वे निवेदन केले । श्रवन केले पिता मातुले ॥१०॥ पिता कन्येचि होता भेटी । आनंद न मावे मातुल पोटी। प्रीती धरोनि जिनदत्त सेटि । द्रव्य दान वाटि दीन याचका १०१ श्री जिनेश्वराचे मंदिरि । हवन करोनि थोरि । कीर्ति विस्तारि पृथ्वीवरि । संकष्टदूरी दवडिले ॥१०२॥ तदा पिता कन्येसी म्हने । बाइ स्वगृहि चालने । जननि सज्जनाही कारने । आनंदाने तोशविजे ॥१०३॥ पित्यासी वदे अनंतमति । म्या पाहिलि संसारवृत्ति । दुःखदायक नाना भांति । न लागे प्रीति गृहवासी ॥१०४॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org