________________
प्रसंग सातवा
निष्कांक्षितांगे अनंतमतिकथा
छेतालिस गुणाचे सागर । चतुर्विशति तीर्थंकर । तत्पंकजि नमस्कार । वारंवार सेवकाचा ॥१॥ निष्कांक्षित गुणाचा उद्योत । अनंतमतिने केला जगात । तत्कथाकथिन श्रावकाहित । येकचित्त आइकावे ॥२॥ अंगदेशामाझारी । नन (नगर) असे चंपापुरी । पंचकल्याणिक झाले तीर्थेश्वरी । त्याचि शोभा थोरी काय वर्ण ।३। स्यानगरीचा भूपति । असे वसुवर्धन धर्ममति । तयाचि राज्ञि लक्ष्मीमति । गुणवति पतिव्रता ॥४॥ प्रियदत्तनामे करोन । त्यानगरी श्रेष्ठी असे जान । जिनपंकजि असे लीन । पूजा दान नित्य करिति ॥५॥ अंगवति त्याचि असे भार्या । प्रवीण असे धर्मकार्या । स्वरूपे जैसि शक्र जाया । जिनपंकजया थोर भक्ति ॥६॥ त्यादोघा कारणे महासती । पुत्रि असे अनंतमति । धर्मवंता शीलवति । करिति प्रीति ग्रामजन ॥७॥ येकदा बाला घेवोनि स्कंधि । प्रियदत्त पिता धर्मबुद्धि । नंदीश्वराष्टमिदिन शुद्धि । जिनमंदिरा मधि प्रवेसला ॥८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org