________________
प्रसंग साहावा : ९५
गुरू आमुचे ससीश्वर । पंचाग्नितपसाधिति थोर । भक्त कार्यासि धावति सत्वर । वैकुंठनगर प्राप्त करिति ॥ २५ ॥
द्वाक्य ऐकोनि अमितगति । वदतसे मिष्ट वचनोक्ति । वा चालावे मध्यलोकाप्रति । जेण्हे हरे भ्रांति कुमताचि ||२६|| तेथे आले असति गुरू । तत्तपाची परीक्षा करूं । जे असति ज्ञानसागरू । तद्भक्ति करू दोघेजन ||२७|| स्वद्गुरू असे जमदाग्नि । मद्गुरू असति महामुनि । वसति गिरिकंदरवनि । मेरुवद्ध्यानि तिष्ठति ॥२८॥ तेथे जावोनि सत्वर । त्याहासि उपसर्ग करूं थोर । जे ध्यानाहोनि न चलति वीर । तो धर्म्मधुरंधर सेउ गुरू ||२९|| ऐसा विचार करोनिया । मध्यलोकि येवोनिया ।
1
अमितगति वदे तया । आधि कौने ठाया चालतोसि ॥ ३०॥
तो वदे जेथ असे मद्गुरु । तेथे चालावे सत्वरु । तत्तपाची परीक्षा करु | धीर कायरु कळु येईल ॥३१॥ तयासि वदे अमितगति । त्वा करावि एक युक्ति । निजनिजरूमपरावृत्ति । कपोतकपोति होउ आपण ॥ ३२ ॥ ऐसा विचार करोनि अंतरि । कपोतिरूप धरिले सत्वरि । होति जालि गरोधर । शब्द उच्चारि अतिमंजुळ ||३३|| कपोतासि वदे हो स्वामी । ह्या ऋषीचे कूच स्थानि । मृदु असे रोमसंचनि । होईन मी प्रसूत येथे ||३४|| ऐसे वदोनि त्वरित । प्रवेस केला कूर्चकांत । तेथे क्रीडा करिति व्यक्त । बाहिर आत जाति येति ॥ ३५ ॥ अमितगति पक्षि होऊन । वदे कपोतिनिकारण । जरि योग्य असे हे स्थान | तरि निर्भयपण येथे राहिजे ||३६||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org