________________
९४ : आराधना-कथाकोष
येकदा कृष्णचतुर्दसि । श्रेष्ठि होता उपवासी । स्मशानि जावोनिया निसि । कायोत्सर्ग ध्यानासि होते धरिले १३ ते स्मशान दिसे भयंकर । कितियक प्रेते आनोनि नर । करिति दहनसंस्कार । नरनारि थोर शोक करिति ॥१४॥ स्वच्छंदे नाचति भूतावळ । शब्द करिति कोल शार्दूल । जेण्हे गर्जति भूमंडल । दिसे विक्राल प्रेतभूमि ॥१५॥ आता हे कथा येथेच राहो । पुढे सांगतो आइका हो । जेण्हे चुके संसारमोह । धराल लाहो धर्माचा ॥१६॥ स्वर्गि येक देव असति । नामे करोनि अमितगति । तो असे शुद्ध सक्ति । जिनपदि भक्ति दृढ असे ॥१७॥ तन्मित्र असे येक देव । विद्युत्प्रभ जयांचे नांव । सदा चित्ति वसे कुभाव । कुगुरू देव नित्य सेविति ॥१८॥ कवने एके दिवसि जान । दोघे एके ठाइ बसून । चित्तोत्से करिति भाषण । प्रीति करोन परस्परे ॥१९॥ अमितगति वदे मित्रात । तू नित्य सेविसि मिथ्यामत । जेण्हे जावोनि दुर्गतित । दुःख अगणित भोगसि ॥२०॥ जन्ही मम मित्र अससि । तन्ही मद्वाक्य ऐकसि । आनंद होईल मन्मानसि । प्रीति दोघासी थोर चालल ॥२१॥ सांडोनी मिथ्यात्वी गुरूदेवा । नित्य अहंतदेव पूजावा । निग्रंथ गुरूचि करि सेवा । जेण्हे होय ठेवा सुकृताचा ॥२२॥ तदा विद्युत्प्रभ म्हणे सज्जन । वे गुरूदेव असे नग्न । क्वचिन्न सेवसनभूषण । लज्जाहीन फिरति वनि ॥२३॥ आमुचा देव लक्ष्मीकांत । राहि रुक्मिणिसहित । नानाविधभोग भोगित । भक्तजनात सौख्यदायक ॥२४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org