________________
प्रसंग सहावा : ९१
सप्त प्रकृतिचा होता क्षय । क्षायिक सम्यक्त प्रगट होय । यत्प्रसादे करोनि भव्य । मोक्षासि जाय तद्भवि ||१०|| जैसे नदीचे डहुळ जल । पात्रि भरिल्या क्वचि होय निर्मल । आंदोलिता पुन्हा गादळ । होय सकल पूर्ववत ॥ ११ ॥ तैसे उपसमसम्यक्त । गुरूपदेसे होय जिवात । पुन्हा सेविति मिथ्यामत । कुगुरूसंगत करोबिया ।। १२ ।। क्षयोपसम्यक्त होय जरि । प्राणि न सोड तिय केसरी । मिश्रधर्माचि प्रीतिकरि । यथामृतावरि विष भक्षिति ॥ १३ ॥ जैसे स्फटिकाचे बासन | अंतर्बाह्य समान ।
तैसे क्षायिक - सम्यक्त जान । निर्मलपण रत्नतुल्य ||१४|| अष्टांगे करोनि सहित | जाणावे राया सम्यक्त । जे पालिति दृढचित्त । ते स्वर्गमोक्षा तद्भवे जाति ॥ १५ ॥ टाळोनि पंचविंशति दोष । जे पालिति सुद्ध सम्यक्तास । तत्पुण्याचा प्रकास । त्रैलोक्यजना सहर्षकारी ॥ १६ ॥ श्रेणिक म्हणे श्रीगुरुराय । अष्ट अंगाचे नांव काय । ते जुदे जुदे सांगावे जेण्हे । नास होय मम अज्ञान ॥१७॥ तत्प्रश्न ऐकोनि गणपति । वदे अगा चेलनापति । तू आर्थिक स्थिर चित्ति । अष्टांग निगुति सांगीन || १८ || निःशंकित प्रथमगुण । निःकांक्षित द्वितीय मान । निर्विचीकत्सा तृतीय जान । चतुर्थं नाम अमूढता ॥ १९ ॥ उपगूहन अंग पांचवा | सुस्थितिकरण जानि सहावा । सप्तम वात्सल्यालंकृत जाणावा | अंग आठवा प्रभावना ||२०|| अष्टांगे करोनि सहित । पंचविंशतिदोष रहित । जे पाळिति शुद्ध सम्यक्त । ते तद्भवि मोक्षात जातिल ||२१||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org