________________
८८ : आराधना-कथाकोष ऐरावत क्षेत्रामाझारी । भूतारण्य वनाभीतरि । वेगवति नदीतीरि । गोशंग भिकारि तापसि वसे ॥३३२॥ शंखिनि नामे असे तज्जाया । तो पापिष्ट संसारि भ्रमोनिया । हरिणशंग नामे करोनिया । तिचे पासोनिया उद्भवला ॥३३३।। विद्युदंष्ट नामे करोन । करिति पंचाग्नि तपसाधन । खगेंद्र वैभव पाहुन । बांधिला निदानबंध यान्हे ॥३३४॥ अहो नागेंद्र या दोघाचे । वैर असे प्राग्भवाचे । हेचि कारण उपसर्गाचे । जानिजे वाचे मम त्वया ॥३३५।। तो संजयंत मुनिश्वर । उपसर्ग साहोनि घोर । अंतकृत् केवलि होवोनि सार । झाला भ्रतार मुक्तिचा ॥३३६।। अहो अहो नागपती । विचित्र असे संसारवृत्ति । जानोनि सोडि हा दुर्मति । दया चित्ति धरोनिया ॥३३७|| तद्वाक्य करोनि श्रवण । म्हने मी सोडितो यालागुन । परंतु यासि श्राप देइन । जेन्हे शासन घडे थोर ॥३३८|| म्हने विद्याधराचे कुलि । जरी ध्यानासि असति बलि । तरी विद्यासिद्धि निर्मलि । कवने काळि न होइजे ॥३३९॥ ऐसे वदोनिया व्यक्त । नागफाशाहोनि केले मुक्त । विद्या छेदोनि समस्त । बलरहित केला त्वरे ॥३४०॥ दिवाकर देवासि वदोनि । बैसोनि स्वकीय विमानी । उद्योग धरिला ततक्षणि । निजस्थानि जावयासि ॥३४१॥ तत्कालि तो विद्याधर । फणींद्रापुढे आला सत्वर । मस्तक ठेवोनि चरणावर । वदे मी किंकर असे तुझा ॥३४२॥ जे जे म्या अपराध केले । ते त्वा न मोजावे वहिले। उदरि पाहिजे साटोपिले । दास आपुले जानोनिया ॥३४३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org