________________
प्रसंग पाचवा : ८७
तौ वज्रायुध मुनिश्वर । प्रियुंग नामे पर्वतावर । ध्याने तिष्टला होता स्थिर । जैसी गिरिवर चूलिका ॥ ३२१॥ भिल्लाने पाहोनिया यती । क्रोधे करोनि दुर्मति ।
।
बाने च्छेदिले मुनिप्रति । मुनिने सुमृति साधिली ।। ३२२|| मग सर्वार्थसिद्धि विमानी । अहमिंद्र पावला मुनि ।
आयु तेत्तीस सागर जानि । सोख्य त्या स्थानी भोगति ॥ ३२३ ॥ तो भील्ल मरोनि पापिष्ट । सप्तम नरकि गेला दुष्ट । तेत्तीस सागर भोगिति कष्ट । दुःख उत्कृष्ट दुराचारी ॥ ३२४ ॥ तो अहमिंद्र सौख्य भोगुन । आयुष्यांते चविला तेथुन । तव" ज्येष्ट बंधु झाला येऊन । नामे करोन संजयंत ।।३२५ ।। सहसेनाचा लघु सुत । जन्म घेवोनि बहुत ।
1
तु संजयांताचा लघुभ्रात । नामे जयंत होतासी ॥ ३२६ ॥ तुम्ही दोघे पिताबरोबरी । दीक्षा घेवोनिया थोरी । तप करित होते भारी । गिरिकंदरि निसिदिन || ३२७|| महद् उग्र तपे करोनि । वैजयंत महामुनि । अष्टकर्मासि जिंकुनि । अचलस्थानी गेला त्वरे ॥३२८॥ ते निर्वाणपूजा करायात । देव आले होते समस्त । त्वा पाहोनि फणींद्र विभूतीत । निदान बंधात बांधिले ॥ ३२९ ॥ शुभध्याने मरोनि सत्वर । तू झालासि भुवनेश्वर |
तेथे सौख्य भोगिसि थोर । पुण्यप्रकर करोनिया ॥ ३३० ॥
तो भिल्ल नरक दुःख भोगुनि । मध्यलोकि येउनि दुर्योनि । तिर्यंच गत्यादि करोनि ।
||३३१॥
४१. हे नागेंद्र.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org