________________
श्रवण करोनि द्विधाधर्म । तोडोनिया मोहनी कर्म । होता झाला मुनिमुत्तम । मोक्ष धाम प्राप्त व्हाव्या ॥ २९९ ॥ भयंकर वनी तपा चरी । क्वचित् वसे गिरिगव्हरि" । शीतकाल नदीतीर । नित्य धरी धर्मध्यान ॥ ३०० ॥
I
प्रसंग पाचक : ८५
तदा येकिय दिवसि । रश्मिवेग महाऋषि ।
गुफामाजि निर्भयेसी । व्युत्सर्ग ध्यानासि होते धरिले ॥३०१ ||
ती कुर्कुटसर्प मरोनि । गेला होता नर्क भुवनि । तेथे नाना दुःख भोगुनि | झाला मरोनि अजगर || ३०२ || प्राक्तन वैरे करोनिया । तो अजगर पापिया । त्वरे जावोनि त्या ठाया । मुनिवरकाया भक्षिलि ॥ ३०३ ॥ उपसर्ग साहोनि थोर । शुभ मृत्यु साधोनि मुनीश्वर । कापिष्टस्वर्गि झाला सुर । देवदेविनिकर पद सेविति ||३०४ || मग तो अजगर दुष्ट । मरोनिया अतिपापिष्ट । चतुर्थ नरकि भोगिति कष्ट । क्रियानष्ट दुराचारी ॥ ३०५ ॥ छेदन भेदन तापन । सूलारोपन विदारन ।
वैतरनीमाजी दुःख दारुण । यथा लवन व्रणामाजि || ३०६ || सहस्र विचुकिल्या जैसी । वेदना होय मानवासी । त्यापेक्षा अधिक दिवानिसि । नारकिकासि होत असे ||३०७ || ऐसे जानोनि ज्ञानि नर । कवनासि न धरावे वैर । सर्वजनासि मित्राचार | निरंतर असू द्यावा ||३०८||
या सहसेन नृपाचा जीव । कापिष्टस्वर्गि असे जो देव । तो मरोनि अतिजन्मोद्भव | पावला ते सर्व सांगितो ॥ ३०९ ॥
३९. गुफा.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org