________________
८४ : आराधना-कथाकोष
तो सिंहचंद्र मुनीश्वर । तपतपोनि महाघोर । अंती मृत्युसाधोनि सार । झाला अहमिंद्र ग्रैवांतिमे ॥२८७॥ यानंतर सभाजन । आइका स्वच्छ करोनि मम् । पुढे कथितो कथन । त्या सिंहसेन भूपतीचे ॥२८८॥ जंबूद्धीपामाजि सार । भरत क्षेत्र असे सुंदर। त्यामाजि पर्वत असे थोर । मनोहर रुप्पाचल ॥२८९॥ तेथे नग्र असे सूर्यपुर । नृप सुरावर्त खगेश्वर । राज्य करिति प्रताप थोर । जिनधर्मावर प्रीति असे ॥२९०॥ यशोधर तपाचि रानी । रूप सौभाग्य गुणाचि खानि । दानपूजाशील गुनि । उपोषण पर्वनिनित्य करी ॥२९१॥ सिंहसेन नृपचरजीव । स्वर्गाहोनि चवोनि देव । तत्गभि जन्मला पुण्यास्तव । रश्मिवेग नाव पावला ॥२९२॥ मग तोऽनुक्रमे करोन । पद पावला यौवन । सर्व गुणे दिसे निपुन । प्राग्पुण्य करोन जानिजे ॥२९३॥ तो सुरावर्त खगेश्वर । अस्थिर जानोनि संसार । पुत्रासि देवोनि राज्यभार । दिक्षा सत्वर घेतलि ॥२९४|| मग तो रश्मिवेग भूप । राज्य करिति स्वप्रताप । धर्म आचरीति निष्पाप । भेदिति व्याप कर्माचा ॥२९५॥ कवने येकिय दिवसि । होवोनि यावि मानवासी। सिद्धकूट चैत्यालयासि । वंदनेसि गेला त्वरा ॥२९६॥ जिनांघ्रि वंदन पूजन । केले शुद्ध भावे करोन । पुन्हा करोनि नमन । दिशावलोकन करिति ॥२९७।। रंगमंडपामाजि सार । हरिचंद्र नामे मुनिश्वर । पाहोनि जावोनि सत्वर । केला नमस्कार तत्पदि ॥२९८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org