________________
86
- श्रावक शिरोमणी डॉ. शेखरचंद्र जैन श्रावक शिरोमणी, आदरणीय डॉ. शेखरचंद्रजी जैन, भारतासारख्या अध्यात्मिक संस्कृति संपन्न देशात | गुजरात सारख्या समृद्ध राज्याच्या राजधानीत अहमदाबाद सारख्या ख्यातनाम औद्योगिक शहरात एका सामान्य जैन कुटुंबात आपला जन्म झाला. यात आपल्या पूर्ण सुकृताचे वरदान आपणाला निसंशय लाभले आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही तीव्रज्ञान लालसेने प्रेरित होऊन आपण शिक्षण क्षेत्रातील पीएच.डी. पदवी संपादन | करून उच्चविद्या विभूषित झालात। ___ जैन साहित्य प्रचारक डॉ. शेखरचंद्रजी! ज्या जैन कुटुंबात आपण जन्म घेतलात, त्या जैन धर्म तत्त्वज्ञानाचा
आपण सखोल अभ्यास करून, त्यासंबंधी अनेक शोध निबंध, टीका ग्रंथ, समीक्षा ग्रंथ, कथा, कादंबव्या, काव्य आणि स्फुट लेख लिहून, हिंदी गुजराती आणि इंग्रजी साहित्यात मोलाची भर घालून, आपण नव्या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहात.
करूणानिधी डॉ. शेखरचंदजी! आपण समन्वय ध्यान साधना केन्द्राचे संस्थापक आहात या संस्थेद्वारा 'श्री आशापुरा माँ जैन होस्पटिल' हा धर्मार्थ दवाखाना चालवून अनेक मागासवर्गीय गरीब दलित रूग्णांना व्याधिमुक्त करून रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा या शुभाषिताची सत्यता पटवून देत आहात. __ गेली अखंड १५ वर्शे तीर्थंकर वाणी च्या संपादनातूत देशविदेशातील युवक-युवतीना जैन धर्माच्या अभ्यासाची अभिरुची निर्माण करण्याचे महान कार्य आपण करीत आहात. हे आपणाला भूषणावह आहे. ___ आपण जैन धर्माचा प्रचार केवळ आपल्या देशातच नव्हे तर युरोप, अमेरीका आदि प्रगत देशातही साहित्य आणि प्रवचन द्वारा करीत आहेत त्याचप्रमाणे ‘णमोकार ध्यान मंत्र' शिबीराद्वारा जैन धर्माचार्य सिद्धांतांची । सत्यता वैज्ञानिक स्तरावर कशी आहे हे सिद्ध करण्याचे कार्य आपण सतत करीत आहात.
आपण जिनप्रभुंचे प्रेषित असून, षखंडागमाचा मतितार्थ सांगणाच्या आधुनिक गणधराचे पवित्र कार्य आपण करीत आहात.
जैन समाजातील गुणग्राहक विद्वज्जनांनी आपल्या महान कार्याच्या गौरवार्थ ज्या अभिनंदन ग्रंथाचे आयोजन केले आहे. त्या ग्रंथमालेत आपल्या सन्मान पत्राचे हे पुष्प गुंफून आले अभिनंदन करण्यात आम्हाला धन्यता वाटते। ___ यापुढेही आपण अंगिकारलेले समाजप्रबोधनाचे कार्य अखंड चालावे यासाठी आपले व आपल्या कुटुंबियांचे उर्वरित आयुष्य आरोग्य संपन्न ज्ञान संपन्न धर्मकार्यात व्यक्ति व्हावे अशी जिनेश्वर चरणी विनम्र प्रार्थना!
प्रो. डी. ए. पाटील ।
चेयरमेन दक्षिण भारत जैन सभा - जैन एकता के प्रतीक तीर्थंकर वाणी के जन्म से ही आदरणीय शेखरजी से मेरा सतत जीवंत संपर्क रहा है। उनसे बुन्देलखण्ड एवं देश के विभिन्न क्षेत्रों में, भोपाल में, श्रवणबेलगोला में और गत वर्ष अमेरिका में भेंट होती रही है। उनका प्रफुल्लित एवं स्नेहपूर्ण व्यक्तित्व अत्यधिक सराहनीय एवं अनुकरणीय है। वे सदैव जैन एकता के पक्षपाती रहे हैं। वे सामाजिक विखराव के प्रति सदैव चिंतित रहे हैं। उनका अनेकांती सहिष्णुता का आग्रह निश्चित ही सराहनीय