________________
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
पुन्हा एकदा महाराज चातुर्मासानिमित्त सोलापुरास आले होते. त्या वेळी त्यांनी गावाबाहेर जागा घेतली होती. त्यांचे पुण्यचरण ज्या भूमीला लागले ती जागा आचार्य शान्तिसागर महाराजांच्या स्मारकाकरिता श्राविकाश्रमाने घेऊन तेथे स्वाध्याय भवन बांधले आहे. आश्रमांत जिनमंदिर व स्वाध्यायभवन तेव्हापासून अस्तित्वात आहे.
१६२
एकदा आम्ही गिरनार येथे पालीठाण्यास गेलो होतो. आचार्य शान्तिसागर महाराजांनी आमच्या आत्याबाई क्षु. राजुलमति यांना तेथे क्षुल्लिकेची दीक्षा दिली. त्याच वेळी श्राविकाश्रमाची जबाबदारी माझेवर टाकण्यात आली. तसेच आणखीही काही व्रते घेण्याबद्दल सांगितले. तेव्हा सातवी प्रतिमा आम्ही घेतली.
तेथून जवळच सोनगड येथे कानजी स्वामींच्या विनंतीवरून आचार्य शांतिसागर महाराज गेले.. त्यांच्याबरोबर आम्हीही सोनगडला गेलो. २५००० श्वेतांबर लोकांचा जनसमुदाय तेथे होता. त्यांनी आचार्य शांतिसागर महाराजांचे भव्य स्वागत केले. श्वेतांबरांना दिगम्बर केल्याबद्दल व ते जैनधर्माचे खरे उपासक झाले आहेत असे धन्योद्गार महाराजांच्या मुखातून निघाले.
याप्रमाणे महाराजांच्या संस्पर्शाने या जीवनाचे सोने झाले आहे. त्यांचेकडून ब्रह्मचर्यादि व्रते घेऊन जीवन सफल झाले आहे. त्यांच्या स्मृती आजही प्रेरणादायक आहेत.
आश्चर्यकारी अचूक निमित्तज्ञान ( राहुरी वाहून गेली )
ध. शेठ चंदुलालजी व हिराचंदजी सराफ, बारामती
संघपतीसह विहार करता करता संघ राहुरी (अहमदनगर) येथे पोहोचला. त्या दिवशी सकाळ, दुपार मिळून अठरावीस मैल चालून झाले होते. दिवस उन्हाळ्याचे होते. सर्वजण अगदीच थकून गेले होते. कधी एकदा विश्रांतीसाठी मुक्काम होतो असे सर्वांना होऊन गेले होते. संघ राहुरीला पोहोचला, तेव्हा दिवस मावळावयास अर्धा पाऊण तास अवकाश होता. तेथे विहीर होती. देऊळ होते. मैदान होते. नदीचे शुष्क पात्र होते. एकंदर मुक्कामाला फार चांगली वाटावी अशी सुंदरशी मोकळी जागा होती.
सर्वजण हुश हुश् करीत क्षणभर टेकले व महाराजांच्या आज्ञेची वाट पाहू लागले. अगदी अक्षरशः चातकासारखी. पण महाराज झपाट्याने आले, क्षणभर सभोवार नजर टाकली आणि येथे मुक्काम करावयाचा नाही असे निक्षून सांगून पुढे चालूही लागले. सर्वजण एक टक त्यांच्याकडे निराशेने पाहू लागले. पण त्यावर काही उपाय नव्हता. काही जण कुरकुरले, पुटपुटले. 'महाराज कोणाचे काही ऐकत नाहीत, केवळ आपल्या मनाला येईल तसेच करतात. ' आग्रह धरल्यावर म्हणाले की, 'तुम्हाला राहावयाचेच असेल तर राहावे वगैरे वगैरे.' दोन मैलांवर सूर्य मावळला आणि महाराज थांबले. तेथेच मैदानात राहुट्या पडल्या आणि सर्वांनी पथाऱ्या पसरल्या. पुन्हा आपली चर्चा तीच. ' महाराजांनी तेथेच राहुरीला मुक्काम करायला
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org