________________
१५८
___ आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ स्वामी को पटाना होगी, उनका निषेध करने से क्या होगा ?....कानजी का निषेध करने से क्या आ.. कुन्दकुन्द का निषेध करना है ?"
सर्वजण महाराजांकडे अवाक् पाहातच राहिले. केवढी विवेकदृष्टीची गंभीरता ? आज याच प्रश्नावरून समाजामध्ये वर्तमानपत्रामध्ये जी असभ्य टीका आढळते, शास्त्राच्या अर्थाची जी कुतरओढ आढळते, ती पाहिली म्हणजे महाराजांचा अभाव जाणवतो व केव्हा ही परिस्थिती काबूत येणार या चिंतेने मन उद्विग्न होते. अशी होती महाराजांची विवेक दृष्टी.
प्रस्तुत लेखक व त्यांच्या कुलकुटुंबियावर महाराजांच्या अपार अनुग्रहाने अनुगृहीत आहेत. त्यांचा सहवास व आशीर्वादाने आम्ही खरोखरच धन्य झालो आहोत. त्यांच्या पावनस्मृतीला अनेक वेळा विनम्र अभिवादन.
आचार्य महाराज चिकोडीचे आसपास असतांना ठिकठिकाणचे श्रीमंत भक्त श्रावक लोक चातुर्मासाकरिता आमंत्रण देण्यास आले होते. त्यावेळी कोगनोळीचे भीमशा व त्यांचे साथीदारही आमंत्रण देण्यास आले होते व स्वतःशी विचार करू लागले की, एवढे रथी महारथी लोक आले असताना आपली डाळ कशी शिजणार ? महाराजांची सामायिकाची वेळ झाली व महाराज सामायिकास बसले तेव्हा भीमशा वगैरे मंडळी गुंफेच्या बाहेर थांबली. पहाटे ४ वाजता महाराज लघुशंकेस बाहेर आले असता शुद्धी करून गुंफेत सामायिकास बसले. महाराजांचे बरोबर भीमशा वगैरेही गुंफेत जाऊन बसले. महाराज सामायिकात असतानाच भीमशा व त्यांचे साथीदार यांनी महाराजांना पाटासह उचलून बाहेर आणले व महाराजांना पाटासह डोक्यावर घेऊन निघाले. महाराजांचे बाकीचे सामान इतर साथीदारांनी बरोबर घेऊन प्रवास सुरू केला. सूर्योदय झाल्यानंतर महाराज बोलले, " अरे मला आता खाली घ्या." नंतर महाराज चालत कोगनोळीस येऊन पोहोचले. नंतर इतर प्रतिष्ठित आमंत्रण देण्याकरिता आलेले महाराजांचा शोध करीत कोगनोळीस आले व महाराजांना म्हणाले, " महाराज, आपणास कोगनोळीस चातुर्मास करावयाचा होता तर आम्हास स्पष्ट सांगावयाचे. एवढे रात्रीच्या रात्री येण्याचे काय कारण होते ?" त्यावर भीमशा म्हणाले, “खबरदार ? या कामी महाराजांची मुळीच चूक नाही. आम्ही दोषी असून आम्ही महाराजांना उचलून आणले आहे." नंतर महाराजांनी हास्य मुद्रेने समजावून सांगितले व चातुर्मास कोगनोळीस करण्याचे निश्चित झाले.
६. जागृत सावधानता महाराजांचे बरोबर मी प्रवासात असताना महाराज नेहमी म्हणायचे की, ॐ सिद्धाय नमः. जेव्हा मी महाराजांना म्हणालो की, “ महाराज ? अरिहंत अगोदर असताना आपण सिद्धाय नमः का म्हणता ? " त्यावेळी महाराज म्हणाले की, 'अरे बाबा, आत्मस्वरूप स्वयंसिद्ध आहे. याची जाणीव राहावी आम्हाला सिद्ध अवस्थेकडे जावयाचे आहे, याचे विस्मरण होऊ नये यासाठी.'
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org