________________
| कर्माची निर्जरा होण्याला आत्म-चिंतन हेच साधन आहे. ते आत्मचिंतन चोवीस घंट्यांपैकी उत्कृष्ट सहा घडी, मध्यम चार घडी, जघन्य दोन घडी, निदान दहा पंधरा मिनिटे, किमान आमचे म्हणणे पांच मिनिटे
प्रत्येकाने करावे. आत्मचिंतनाशिवाय सम्यक्त्व प्राप्त होत नाही; संसारबंध तुटत नाही; जन्म, जरा व मरण सुटत नाही. सम्यक्त्वाशिवाय दर्शन मोहनीय कर्माचा क्षय होत नाही. सम्यक्त्व होऊन सहासष्ठ सागरपर्यंत कदाचित् राहील, तरी चारित्र - मोहनीय कर्माचा क्षय करण्याकरिता संयमच धारण करायला पाहिजे. भिऊ नका ! संयम धारण करावयास भिऊ नका !! कपड्यात संयम नाही. कपड्यात सातवे गुणस्थान नाही. संयमाशिवाय वास्तविक कर्मनिर्जरा नाही. कर्मनिर्जरेशिवाय केवलज्ञान नाही व केवलज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून भिऊ नका ! भिऊ नका !! संयम धारण करावयास भिऊ नका !!! मुनिपद धारण करा ! त्याच्याशिवाय कल्याण होणार नाही.
" आत्मानुभवाशिवाय खरं ( निश्चय ) सम्यक्च होत नाही. व्यवहार सम्यक्त्व खरं ( परमार्थरूप ) नाहीं. ते केवळ साधन आहे. फल येण्यास फूल जसं कारण आहे तसं व्यवहारं सम्यक्त्व निश्चयाचं कारण आहे, असं कुंदकुंदस्वामींनी समयसारात सांगितलं आहे.
66
पुद्गल आणि जीव भिन्न भिन्न आहेत हे सर्वजण सामान्यपणे समजतात; परंतु ते खरं समजलेलं नाही. खरं समजलं असतं तर भाई, भगिनी, बंधु, माता, पिता यांना आपलं म्हणून समजलं नसतं. हा सगळा पुंद्गलाचा संबंध आहे. जीवाचा कोणी नाही रे बाबा ! कोणीही नाही !! जीव हा एकटा आहे ! एकटा आहे !! त्याचा कोणी नाही. एकटाच फिरतो आहे. मोक्षालाही एकटाच जाणार आहे.
'देवपूजा, गुरूपासना, स्वाध्याय, संयम, तप व दान या सहा गृहस्थाच्या क्रिया आहेत. असि, मसि, कृषि, शिल्प, वाणिज्य आणि विद्या या सहा धंद्यांपासून होणाऱ्या पापांचा त्या सहा क्रियांनी क्षय होतो. त्यामुळे इन्द्रियसुख मिळतं, पुण्य प्राप्त होतं, पंच पापांचा त्याग केल्यापासून पंचेन्द्रिय सुख मिळतं, पण मोक्ष मिळत नाही. संपत्ति, संतति, वैभव, राजपद, इंद्रपद पुण्यानं मिळतं. परंतु मोक्ष फक्त आत्मानुभवानेच मिळतो. नय (युक्ति), शास्त्र व अनुभव या तिन्हींचा मेळ घालून पाहावा. मोक्ष कशानं मिळतो ? मोक्ष आत्मानुभवानेच मिळतो. ही भगवंताची वाणी आहे. ही एकच सत्य वाणी आहे. ह्या वाणीचा एक शब्द ऐकला तरी जीव चढून मोक्षाला जातो. मोक्ष मिळण्यास फक्त आत्मचिंतनच कारण आहे. हे कार्य करायलाच पाहिजे.
""
“सारांश, 'धर्मस्य मूलं दया' जिनधर्माचं मूळ 'सत्य अहिंसा' आहे. ' सत्य अहिंसा ' आपण सगळे तोंडानं म्हणतो. 'स्वयंपाक - जेवण ' ' स्वयंपाक - जेवण ' असं फक्त तोंडानं म्हटल्यानं पोट भरतं का ? प्रत्यक्ष क्रिया केल्याशिवाय -जेवल्याशिवाय पोट भरत नाही. वचन क्रियेमध्ये आणलं पाहिजे.
“ बाकी सर्व सोडा. ' सत्य अहिंसा सत्यामये सम्यक्त्व येतं व अहिंसेमध्ये सर्व जीवाचं रक्षण होतं. म्हणून हा व्यवहार करा. हा व्यवहार पाळा. त्यामुळं कल्याण होईल. " ( आता पुरे हे ).
Jain Education International
For Private & Personal Use Only
ak.
www.jainelibrary.org