________________
स्मृति-मंजूषा
१२९ यानंतर श्रावक मंडळीत अतिशय खळबळ उडाली. कारण यास श्रावकांचा प्रमाद व अज्ञानच जबाबदार होते. आता जो तो स्वतःच्या चुकीबद्दल स्वतःचीच निर्भर्त्सना करीत होता. पण गेलेली आठ वर्षे परत येणार होती थोडीच ! फार तर भविष्यांत सावधगिरी बाळगता येईल एवढेच
दुसरे दिवशी सर्वांनी आहारात मोठ्या उत्सुकतेने चटणी भाजी वगैरेची तरतूद केली व अतीव उत्साहात आहार देण्याच्या तयारीने उभे राहिले पण काय ? आचार्य महाराजांनी पुन्हा पूर्ववत दूध भात आणि पाणीच घेतले नी खाली बसले. पुन्हा चर्चा सुरू ? शास्त्राचे वेळी ( पुन्हा प्रश्नोत्तरे )
महाराज आज आमचे काय चुकले ? महाराज म्हणाले : तुम्ही पीठ केव्हा दळले ? श्रावक :- आज पहाटे दोन तास रात्र असताना. महाराज :- ठीक ? तिखट केव्हा कुटून ठेवले ? श्रावक :- चैत्र वैशाखाच्या उन्हाळ्यात ! महाराज :- मग आम्ही ते कसे घेणार ?
श्रावक उमगले. त्यांनी आपली दूसरी चूक दुरुस्त केली. व तिसऱ्या दिवशी भाकरी भाजी चटणी असा आहार, गेल्या आठ वर्षांनंतर घेतला गेला.
तो आहार घेताना यत्किंचितही असंयम, घाई त्यांना झाली नव्हती, तसे असते तर आदल्या दिवशीच त्यांनी ती घेतली असती.
पण आचार्य महाराजांचा पराकोटीचा संयम, तप आणि भक्ष्याभक्ष्याचा विवेक तीव्रतेने जागृत होता. हे सिद्ध होते हे केवळ आचार्य श्री करू जाणे.
धन्य ते आचार्य ? धन्य त्यांचा संयम ? धन्य त्यांचा भक्ष्याभक्ष्य विवेक ? धन्य त्यांची अबोल घृत्ती ? व धन्य ते चतुर्थकालीन मुनिवृत्तीचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारे आचार्य शांतिसागर !
आचार्यश्रींचा उद्दिष्ट आहारत्याग पन्नास वर्षांपूर्वीचा काळ ! आचार्य महाराजांचा चातुर्मास नसलापूरला होता. महाराज आहारात मोजक्या वस्तु घेत असल्यामुळे आहार देणे फारच सोपे होते. त्यामुळे आहारदानाचे पुण्यउपार्जन करण्यासाठी चढाओढ लागली होती. पण आहाराला योग्य असे एकच स्थान निर्माण करण्यात आले होते व ते म्हणजे श्री. श्रीमंधर कत्ते ह्यांच्या घरातील एक खोली. ज्या कोणाला आहार द्यावयाचा असेल त्यांनी त्यांच्या खोलीत स्वयंपाक करावा आणि आहार द्यावा असा जणू संकेतच ठरल्यासारखा झाला होता.
परगावचे लोक आहारदानासाठी मोठ्या उत्साहाने येत असत. पण आहारदानासाठी त्यांचा नंबर लागणे ही त्या घरमालकाच्या इच्छची बाब होऊन बसली होती. एखाद्याला त्याच दिवशी मिळे तर
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org