________________
स्मृति-मंजूषा पाहून चिंतित झाली. वादाचा शेवट काय होणार ह्या विवंचनेत ते होते. पंडित लोक असेच शहरभर आपल्या विजयाचा व जैनाचार्यांच्या अज्ञानाचा डांगोरा पिटतील ही चिंता रास्तही होती.
पण काही क्षण स्तब्धतेत गेल्यावर आचार्य महाराज प्रशान्त मुद्रेने त्या ब्राम्हण पंडितांकडे पहात म्हणाले 'आम्ही आपणांस काही विचारले तर चालेल का ?' 'अगदी अवश्य' ते सर्व जण एका आवाजात म्हणाले. 'ही गंगा नदी शुद्ध आहे की अशुद्ध ?'– महाराज 'गंगाच काय पण यमुना, कृष्णा, सरस्वती, नर्मदा ह्या सर्व नद्यांचे पाणी शुद्ध आणि पवित्र आहे'–ब्राम्हण पंडित. गंगेच्या उगमापासून बनारसला येईपर्यंत ह्या गंगेला अनेक नद्या, नाले, गटारे येऊन मिळाली असतील हे खरे काय ?'महाराज. 'अगदी खरे'- पंडित. 'शहराचे सर्व सांडपाणी ह्याच प्रवाहात सोडलेले आहे. शिवाय काशी येथे मणिकर्णिका घाटावर दहन करण्यात येणारी अर्धवट जळालेली प्रेते व पूर्ण जाळलेल्या प्रेतांचे हाडादिकांचे अवशेष दररोज ह्यात समाविष्ट होतात हे खरे आहे ना?'-~-महाराज. 'खरे आहे '-पंडित. गंगेत मगर, मासे, बेडूक, सर्प आदिक जलचर प्राणी मरतात त्यांची शरीरे तेथेच कुजतात. आणि हे जेव्हा जिवंत विहार करतात तेव्हा मलमूत्र तेथेच विसर्जन करतात, हे खरे ना ? '–महाराज. 'हेही खरे ' पंडित.
_ 'एवढे सगळे असूनही गंगा नदी ही परम पवित्र जशी असू शकते तसेच रक्त-मांसमय सप्तधातुमय शरीरातून मिळणारे गाई-म्हशीचे दूध हे पवित्र-शुद्ध-ग्राह्यच असू शकते.' आचार्यश्रीची उपदेश पद्धति बाळबोध-मूलग्राही पण प्रभावी होती ती अशी.
त्यांना सहा महिन्यानंतर पहा
श्री. पू. आदिसागर महाराजांचा कारंजा येथे चातुर्मास असतांना त्यांच्याशी आचार्य श्री व ते स्वतः यासंबंधी बोलणे झाले. ह्यांतून टिपलेली ही एक आठवण; महाराजांचा स्वभावविशेष प्रगट करीत असल्यामुळे ती येथे देणे उचितच होईल.]
डॉ. हेमचंद्र वैद्य
शेडवाळ (ता. अथणी, जि. बेळगांव) येथील एक संयमशील श्री बाळगौंडा पाटील हे वैराग्याकडे वाटचाल करीत असता रक्तक्षयाच्या व्याधीने त्यांना पछाडले. वर्तमान पर्याय सत्कारणी वेचावा हा आंतरिक भाव होता.
भगवती दीक्षा धारण करण्याचा मनोदय व्यक्त झाला. मुहुर्तासाठी काही दिवस गेले. दीक्षा देण्याचेही निश्चित ठरले. हे दर्शनाला येणाऱ्या काही श्रावकांच्या लक्ष्यात आले. हे काही बरोबर होणार नाही या विचाराने आचार्यांना विनविले, ' महाराज ! आम्ही पामरांनी आपणांस शिकवावे असे नाही. क्षमा असावी. आपण ज्यांना दीक्षा देण्यासाठी मुहूर्त पाहात आहात तो ब्रह्मचारी रक्तक्षयाने मृत्युची वाट चालू लागला
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org