________________
-
श्री पाश्र्वनाथ प्रभंची
उज्वल कथा
सुधांशु, औदुंबर
सहस्त्रावधी वर्षे झाली-घडली उज्वल कथा वाराणसि नगरीत देखिला कल्पवृक्ष डोलता ।
अश्वसेन ईक्ष्वाकू नृपवर
वामादेवी वनिता सुंदर त्यांच्या सदनी अवतरला प्रभु त्रैलोक्याचा पिता ॥१॥
प्रमुदित झाले देव मुनीवर
गाती निर्भर नारद तुंबर अमित युगांच्या दिव्य तपांची होय सुखद सांगता ॥२॥
पार्वकुमार सु-नाम पावला
प्रजाजन मनी मोद दाटला राजमदिरी स्वर्ग सुखाचा नित्य दिसे बहरता ॥ ३ ॥
बालवयी तो अघटित घडवी
लिगाधिपति शौर्य दिपवी शौर्य शांति युति घडवि, सोडवी प्रभावती नपसुता ॥४॥
घामासति अश्वसेन नपती
सुत सामर्थ्य हर्षित होती आणि लग्नमागल्य ठरविती होय प्रजा हर्षिता ॥५॥
प्रसेनजित कन्यका मनोहर
पार्श्वकुमारहि उचित तिला वर सुवर्णास जणु सुगध सुदर, अमृतास चारूता ॥ ६॥
२०४ ]
[ श्री कुभोजगिरी शतादि महोत्सव