________________
मूरतसे बड़ी कीरत !
आज मी मूर्ति वनी देखिली । देखुनी कीर्ति मनी रेखिली ॥ध्रु.॥ शान्त वनाचा सुरम्य परिसर
शान्त वनाचा शान्तीसागर पार्श्वनाथ हे स्थान विराजे कोल्हापुर-मडळी ॥१॥
फत्तेचद शिरढोण-निवासी
शताब्दिपूर्वी पापविनाशी मूर्ति स्थापिलो, जैनाची जणु भाग्यदेवी हासली ॥२॥
अन्तरिक्ष, भटेवा, अवन्ती
सूरजमण्डण, शखेश्वर, ती पार्श्वनाथ-नामावलि जपुनी पुनीत हो जिभली ॥३॥
सत्य, अहिंसा, अस्ते यांची
अपरिग्रह, ब्रह्मचर्य साची जैनतत्त्वमालाच मानवा मातेची साऊली ।। ४ ।।
अशुभ वासना, विकार, आशा
जीवा जखडुनी नेती नाशा मानव बनला सैतानाच्या हातातिल बाहुली ॥५॥
धकाधकी ही संसाराची
उसत नाही निमिषभराची ध्यान-धारणा निवान्त करण्या तीर्थे ही चागली ॥ ६ ॥
हे मनि आणुनी, धना वेचुनी
सुवर्णात बसविली हिरकणी फत्ते दात्याची ही भासे । शाति जिवा लाभली ॥ ८॥
कृतार्थ झाला कुभोजगिरी
श्वेताबर-मन्दिरा धरि शिरी आत्मज्ञाना ललाम शाला, धर्मध्वजा शोभली ॥८॥
भा. ल. रानडे BA (Hons )
सागली
-
-
-
-
[श्री कुंभोजगिरी शताब्दि महोत्सव