________________
प्रस्तावना. श्री. अज्ञात उर्फ मोतीलाल गांधी यांनी प्रस्तुत 'श्री महावीर चरित्र' लिहून जनधर्मानुयायचि नव्हे तर सर्व मराठी वाचकांवर उपकार केले आहेत, असे हे पुस्तक वाचणा-यांस वाटल्यावाचून राहणार नाही. सामान्य वाचकांपैकीच पण त्यांच्याहून काही गुणांनी श्रेष्ठ अशा पुरुषाचे चरित्र वाचकांना एका दृष्टीने जास्त मनोरंजक वाटण्याचा संभव आहे. कारण अशा चरित्रांत साधारण माणसाच्या अनुभवाच्या गोष्टींचाच मुख्यतः समावेश होतो व अशा सर्वसाधारण प्रसंगी आपल्याहून काही अंशी थोर असणान्या चरित्रनायकाने काय केले हे जाणण्याची उत्कंग वाटते. शेकडो जन्मांत ज्यांनी आत्मोन्नाची पूर्वतयारी अलौकिक प्रमागांत केली असल्यामुळे चरित्र विषयभूत आयुःक्रमांत ज्यांचे जीवन सामान्य दृष्टीने अतिशय चमत्कृतिपूर्ण झालेले असते त्यांचे चरित्र अशा वाचकांना, की ज्यांना स्वत:च्या व चरित्रनायकाच्या जीवनात काहीतरी साम्य पाहण्याची इच्छा असते त्यांना, आकर्षक वाटणे काण आहे. परंतु अशा मुक्तात्म्यांची चरित्रं निराळ्याच भावनेने वाचली पाहिजेत. आपल्या आकुंचित जीवनांत येणारे लहानसान अनुभव, छोट्यामोठ्या पण सांसारिक अडचणी व त्यांतून पार पडण्याचे सांसारिक मार्ग श्रीमहावीरस्वामी त्या चरित्रांत आढळणार नाहीत. परंतु अशा गोष्टीकरिता त्यांचे चरित्राकडे जाणें हेंच चुकीचे आहे. फुटक्या शिंपल्या गोळा करण्यासाठी समुद्राच्या तळाला जाणं मूर्खपणाचे आहे. त्या पाहिजे असव्यातर गांवोगावचे उथळ ओढे काय कमी आहेत ? परंतु ज्यांना असल्या शिंपन्याऐवर्जी बिनमोल मोती हवा असतील त्यांनी महासागरांत बुडी मारावी व तेथेच त्यांच्या प्रयत्नाला यशहि येण्यामारखे असते. उपा दुःखपरिणामी मुखाच्या आशेने प्रत्येक जीव गणित वर्षे धडपडत आहे व इतके करूनहि जी आशा कधी तृप्तच होत नाही त्या आशेने केल्या जाणाऱ्या विफल धडपडीतून आत्म्याची कायमची सुटका व्हावी व शाश्वत आनंद प्राप्त व्हावा अशी इच्छा ज्यांच्या अंतःकरणांत जागृत झाली असेल त्यांना या चरित्रांत मार्गदर्शक प्रकाश मिळेल. श्रीमहावीरचरित्र ते कोणीहि लिहिललं असो, हा एक धर्मग्रंथ आहे याच दृष्टीने हे चरित्र हाती घेतले पाहिजे व त्या दृष्टीने हे पुस्तक वाचणाऱ्यांना पुष्कळच फायदा होईल यात शंका नाही.