________________
जैनधर्माचे प्राचिनत्व
ज्ञांची कोती दृष्टि स्पष्ट होते. वेदशास्त्रसंपन्न म्हणतात कीं, हें विश्व परब्रह्मांतून उत्पन्न झालें व उत्पत्तिस्थितिलय ब्रह्माविष्णुमहेश करतात. स्त्रिश्चन मिशनरी म्हणतात कीं आकाशांतील बापानें हें जग सहा दिवसांत निर्माण केलें व सातवे दिवशी विश्रांती घेतली. मुल्ला मौलवीहि अशाच तऱ्हेनें हें जग अल्लानें पैदा केलें असें म्हणतात. हल्लींचे इतिहासज़द्दि आपल्या ज्ञानाच्या घमेंडींत असेच म्हणतात की, धर्मज्ञानाची उत्क्रांति अलीकडे होऊ लागली व पूर्वी ही मानव जाति अगदी रानटी अवस्थेत होती. या कोत्या दृष्टीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच. सुधारलेले व रानटी, बरें व वाईट, सुख व दुःख वगैरे सर्व द्वंद्वे तिन्ही काली असतात म्हणजे ती अनादि अनंत आहेत. काल अनंत आहे व जीवहि अनंत आहेत; तेव्हां घडामोडीहि असंख्य झाल्या असणारच.
वरीलप्रमाणे वस्तुस्थिति अराली तरी मनुष्याची बुद्धि जोपर्यंत पोहोंचते तेथपर्यंतच्या अतीत व अनागतकालाबद्दलच तेवढी वर्तमानकाली चर्चा करणें दावगे नाही. मात्र वर वर्णिलेली कोती दृष्टि असूं नये. वस्तुत: इतिहास अनाद्यनंत व भविष्य अगम्य आहे; तथापि प्रचलित कल्पनेप्रमाणे ऐतिहासिक दृष्टीनें विचार करूं. जैनधर्मग्रंथानुसार सव्वीसावर एकशेचाळीस शून्यें दिलीं असतां जी संख्या होते तितक्या वर्षीचा जुना इतिहास आहे. वैदिक धर्मग्रंथावरून जुना इतिहास इ. स. पूर्व १९७२९४७१०१ इतक्या वर्षांचा प्राचीन आहे. पारसी धर्मग्रंथानुसार सहावर एकशेवीस शून्ये दिली असतां जी संख्या होते तितक्या वर्षांचा जुना इतिहास आहे. यहुदी व ख्रिस्त धर्मग्रंथानुसार इ. स. पू. ४००४० व्या वर्षी सृष्टीची उत्पत्ति झाली असे माण्यांत येते. भूगर्भशास्त्रवेत्त्यांच्या दृष्टीनें सृष्टीचा आरंभ होऊन कमीत कमी बीस हजार वर्षे झाली असली पाहिजेत असे सिद्ध झाले आहे. मि. जे. एस्. केनेडी लिहितात की, आर्य जातीची उत्पत्ति इ. स. पूर्वी साठ हजार वर्षांपलीकडची आहे. वरीलप्रमाणे इतिहासकाळाबद्दल असंख्य विचार आहेत. मनुप्यजाति सर्वत्र पूर्वीपासून आहे की ती कोणत्या तरी एका देशांत अनुक काळी उत्पन्न झाली याबद्दलहि बरेंच अभिप्राय आहेत. लो. टिळकांनी वेद ग्रंथाधारें उत्तर ध्रुवाजवळ सहा हजार वर्षांपूर्वी मनुष्यजाति होती असे सिद्ध केलें आहे. मनुस्मृतीत ती सप्तमनुपासून कुरुक्षेत्रांत उत्पन्न झाली असे लिहिले आहे. पं. रमेशचंद्र म्हणतात की भोगोलियांत प्रथम तो निर्माण झाली व श्री. बी. सी. मुजुमदार म्हणतात कीं ती हिमालयाचे पायथ्याजवळ झाली.
(१५)