________________
महावीरचरित्र
सर्व विद्यात पारंगत असतात व (१०) त्यांच्या प्रभावाने भासपास शंभर योजनांतील दुर्मिक्ष नष्ट होते. तीर्थकरांना देवगतीचे इंद्रादिक जीव आठ प्रातिहार्य करतात ते खालीलप्रमाणे. सिंहासन, छत्रत्रय, चौसष्ठ चामरे, पुष्पवृष्टि, अशोकवृक्ष, भामंडल, दुंदुभि व दिव्यध्वनि. याशिवाय खालील चौदा अतिशय देवकृत आहेत. (१) समवसरण ( २ ) प्रफुल्लित पुष्पफल ( ३ ) निवरत्व (४) स्वच्छभूमि (५) सुगंधवायु ( ६ ) निरभ्र आकाश ( ७ ) सर्व जीवांना आनंद (८) जेथे जेथे तीर्थकराचे पाऊल पडेल तेथे तेथे कमलोद्भव (९) सर्व धान्य प्रफुलित होईल (१०) जयजयकार शब्द (११) गंगोदकवृष्टि (१२) धर्मचक (१३ ) सर्व बोध भाषा (१४) छत्र, चामर, ध्वजा, झारी, दपण, अंगट व पंखा ही आठ मंगल द्रव्ये. याप्रमाणे अनंतज्ञान, अनंतदर्शन, अनंत सुख अनंतबल हे अनंत चतुष्टय तीर्थकराला असते. मिळून शेचाळीस विशेष गुण झाले. याशिवाय तीर्थकर अष्टादश दोषविरहित असतात. ते दोष खालीलप्रमाणे. (१) क्षुधा (२) तृषा (३) भय ( ४ ) द्वेष (५) प्रीति ( ६ ) मोह (७) चिंता (८) जरा (९) मृत्यु (१० ) खेद (११) स्वेद (१२) मद (१३) रति (१४) विस्मय (१५) जन्म (१६) निद्रा (१७) रोग व (१८) शोक.
वरीलप्रमाणे तीर्थंकराचे विशेष गुण आहेत. हे गुण असतील त्यालाच तीर्थकर म्हणता येईल. वरील गुणांत अस्वभाविक असे काहीच नाही. तसे वाटले तरी ते वाटण्याचे कारण अज्ञान होय. ते वर्णन खोटें आहे असे मात्र नव्हे. वरील वर्णन नीट वाचणाऱ्यास तीर्थकर म्हणजे काय याची कल्पना येइल. तीर्थकर म्हणजे जैनांचा देव अशी सामान्य कल्पना रूढ आहे. पण देवाबद्दलच्या कल्पनाहि असंख्य आहेत. महंमदी, ख्रिस्ती, दयानंदी वगरे मताचे लोक देव निर्गुण, निराकार, सर्वव्यापी व कर्तुमकतुमन्यथाकतु शक्ति असलेला मानतात. पण यापलीकडे ते त्याचे वर्णन करू शकत नाहीत. कारण तो सगुण नाहीच. हिंदूतील काही मताचे लोक देव सगुण मानतात. पण त्या गुणांची निश्चिति नाही. 'यद् यद्विभूतिमत्सर्व' जेथे जेथे काही विशेष दिसंल तेथे तेथे देवांश असणारच, अशी त्यांची समजूत. त्यामुळे कसा अनवस्थाप्रसंग ओढवतो ते सर्वांच्या परिचयाचंच आहे. वरील कल्पनेमुळे वाटेल तो देव ठरू शकतो व वाटेल तो गुरु होऊ शकतो. सामान्य व्यवहारांत सुद्धा अशास्त्रीयपणा चालत नाही. मग विद्यांची विद्या जी अध्यात्मविद्या तीमध्ये असा गोंधळ कसा खपावा ?
(८)