________________
महावीरचरित्र
नमूद आहेत; हे सर्व वाङ्मय आबालवृद्ध पुरुषांना कळू शकते. पुराणांतून चमत्कार असतात; पोवाक्यांतून अतिशयोकीची वर्णने असतात; व थोर पुरुषांच्या चरित्रांतूनहि अजब गोष्टी वर्णिलेल्या असतात; तथापि त्या सामान्य लोकांनाहि आकलन होतात व पटतातहि. वरील सर्व थोर पुरुष अलौकिक खरेच; तरीपण त्यांची अलौकिकता सामान्य वुद्धीलाहि आकलन होऊ शकते. पण आम्ही ज्या महावीर स्वामींचे चरित्र लिहिणार आहोत त्यांचे माहात्म्य बुद्धिगम्य नाही, तर्काला पटणारे नाही व शुद्धात्म्याशिवाय इतर कोणाला अनुभवगम्यद्दि नाही. सामान्य नैसर्गिक लीलाहि तर्कागुढे टिकत नाहीत व बुद्धीला चक्रीत करून सोडतात; तर मग शुद्धात्म्याचे अलौकिक व परिपूर्ण सामर्थ्य बुद्धीच्या, तर्काच्या व सामान्य माणसाच्या अनुभवाच्या टप्प्यांत न आल्यास त्यांत नवल कसले ? सर्व नैसर्गिक घडामोडी मनोगम्य व बुद्धिगोचर असूनहि सामान्य माणसालाच काय पण भक्तिकशास्त्रवेत्त्यालाहि क्षणभर का होईना पण चकित करून सोडतात; मग जा विषय इंद्रियगस्यच नाही त्याचा पार बुद्धीला कसा लागणार : थोरांचे गुण गाण्यालाहि त्यांच्यासारखेच प्रासादिक की जन्मावे लागतात असं एका कवीचे वचन आहे. त्याला अनुसरून पूर्णात्म्याचे गुणगान करण्यासहि तसेच लायक युद्धात्मेच असाव लागतात असे म्हणावे लागते.
पण सामान्य माणसाला ज्या गोष्टी कळत नाहीत त्यांचे अस्तित्वच नाही असें म्हणता येणार नाही. हवा दिसत नाहीं; सर्व पृथ्वी कोणी पायाखाली दुलविली नाही; तेजोगोलांची संख्याहि प्रत्येकाने मोजलेली नाही. तरीपण पंचभूतांचे अस्तित्व व गुणधर्म अनुभवांस येतात म्हणून शास्त्रज्ञांच्या सिद्धान्तावर आपण विश्वास ठेवतोच. शिवाय आत्म्याच्या किंवा ईश्वराच्या अस्तित्वाला व सामर्ष्याला स्वानुभवाशिवाय इतर प्रमाणांची जरूरीच नाही; पण हा अनुभव केव्हां तरी सर्वच प्राणिमात्रांना यावयाचा असला तरी एका विवक्षित वेळी तो अनुभव सर्वानाच आलेला असतो असे नाही. अशा वेळी 'बाबावाक्यं प्रमाणाम" हा
अतिशय निंदित मार्गच पत्करावा लागतो व धार्मिक बाबतींत बहुतेकांनी हाच पत्करलेला आहे. पण अध्यात्मिक बाबतीत बाबावाक्यापेक्षा आप्त वाक्याला अधिक महत्व आहे व हे आप्त म्हणजे आत्मसिद्धि ज्यांना झालेली आहे तेच होत. या आप्तांना काही तरी खोटेंच सांगून दुनियेला झुकविण्याचे काहींच कारण नसते; सत्यकथन हाच त्यांचा उद्देश असतो व म्हणूनच आपल्या मनाला
(२)